Upcoming Smartphones in January 2025: नवीन वर्ष 2025 सुरु होण्यासाठी फक्त काही दिवसांचा अवधी उरला आहे. नव्या वर्षाची सुरुवात टेक विश्वात मोठ्या उत्साहात होणार आहे. कारण, या नवीन वर्षाची सुरुवात धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोनने होणार आहे. होय, OnePlus आणि Samsung सारखे ब्रँड फ्लॅगशिप श्रेणीमध्ये नवे स्मार्टफोन्स सादर करण्यास सज्ज झाले आहेत. जानेवारी 2025 मध्ये भारतात लाँच होणाऱ्या मोबाईल फोन्सची यादी पाहुयात-
Also Read: आगामी Samsung Galaxy S25 सिरीजचे लॉन्चिंग डिटेल्स Leak! मिळतील अनेक Powerful फीचर्स
फ्लॅगशिप किलरच्या आगामी OnePlus 13 फोनची प्रतीक्षा अनेक दिवसांपासून सुरू आहे. भारतात 7 जानेवारीला हा स्मार्टफोन दाखल होण्याची अपेक्षा आहे. फोनबद्दल अनेक माहिती लाँचपूर्वीच उघड झाली आहे. उत्तम परफॉर्मन्स आणि प्रोसेसिंगसाठी क्वालकॉमचा सर्वात पॉवरफुल चिपसेट Snapdragon 8 Elite देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये हॅसलब्लॅड ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध आहे. ज्यामध्ये 50MP चे तीन लेन्स आहेत. समोर 32 MP चा सेल्फी कॅमेरा आहे. विशेष म्हणजे OnePlus 13 मध्ये पॉवरफुल 6000 mAh ड्युअल-सेल बॅटरी देखील आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, OnePlus 13R संपूर्ण जगात प्रथम फक्त भारतात लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन 7 जानेवारी 2025 रोजी सादर केला जाईल. OnePlus ने म्हटले आहे की, OnePlus 13R 6,000mAh बॅटरीसह लॉन्च केला जाईल, ज्यासह 80W SuperVOOC चार्जिंग मिळू शकते. परफॉर्मन्ससाठी हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 सह येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी, या फोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX906 मुख्य सेन्सर आढळू शकतो. विशेष म्हणजे OnePlus 13R मध्ये स्विच ॲक्शन बटण देखील प्रदान केले आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme 14x 5G फोन नुकतेच भारतात लाँच केला आहे. त्यांनतर, आता भारतात Realme 14 Pro सिरीजचे आगमन होणार आहे. Realme 14 Pro आणि Pro+ भारतात जानेवारी 2025 मध्ये लाँच केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे रंग बदलणारा बॅक पॅनल असलेला हा जगातील पहिला फोन असेल, जो तापमानानुसार त्याचा रंग बदलेल. Realme 14 Pro मध्ये फ्लॅट स्क्रीन आणि 14 Pro Plus मध्ये क्वाड-कर्व स्क्रीन दिसू शकते. या सिरीजमधील टॉप मॉडेल म्हणजेच Realme 14 pro+ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7S Gen 3 ऑक्टाकोर प्रोसेसरवर काम करेल. या सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये 50MP चा OIS रियर कॅमेरा मिळेल.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक जायंट Samsung ची आगामी फ्लॅगशिप सिरीज Samsung Galaxy S25 सीरीज येत्या 22 जानेवारीला लाँच होण्याची शक्यता आहे. सिरीजमध्ये Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra स्मार्टफोन लाँच केले जातील. हे फोन्स Exynos 2500 प्रोसेसरवर भारतात लाँच होऊ शकतात. लीकवर विश्वास ठेवला तर, Galaxy S25 आणि Galaxy S25+ मोबाईल फोन 50MP च्या मुख्य कॅमेरा सेन्सरला सपोर्ट करेल. तर Samsung Galaxy S25 Ultra मध्ये Gemini Nano (v2) AI तंत्रज्ञान दिसू शकते. हा फोन Qualcomm च्या Snapdragon 8 Elite चिपसेटवर लाँच केला जाईल, अशी चर्चा आहे.