2023 वर्षाची शेवटची तिमाही सुरू होत आहे. आता पर्यंत वर्षातील सर्वात मोठे स्मार्टफोन लॉन्चिंग इव्हेंट पार पडले आहेत. पण ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत जवळजवळ प्रत्येक ब्रँड आपले नवीन आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी सादर करतात. त्यामुळे अजून बरेच काही नवीन लाँच होणे, बाकी आहे. ऑक्टोबर 2023 देखील अनेक नवीन स्मार्टफोन्सच्या लाँचसाठी सज्ज झाला आहे. पुढील महिन्यात भारतात लाँच होणाऱ्या सर्व मोबाईल फोन्सची यादी आम्ही पुढीलप्रमाणे तयार केली आहे.
Phantom V Flip हा Tecno ने बनवलेला दुसरा फोल्डेबल फोन आहे. हे उपकरण सिंगापूरच्या माध्यमातून जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले आहे. हा फोल्डेबल स्मार्टफोन बाजारातील इतर उपलब्ध स्मार्टफोन पेक्षा स्वस्त किमतीत लाँच झाला आहे. भारतात पहिल्यांदा 1 ऑक्टोबर रोजी विक्रीसाठी उपलब्ध होईल. या दिवशी, फोनची अर्ली बर्ड सेल होईल, ज्यामध्ये Phantom V Flip 49,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असेल. या फोनमध्ये 6.9 इंच लांबीचा FHD+ AMOLED प्रायमरी डिस्प्ले आणि 1.32 इंच लांबीचा AMOLED कव्हर स्क्रीन आहे. यात 64MP मेन रियर आणि 32MP फ्रंट कॅमेरा देखील आहे.
कंपनी 4 ऑक्टोबर रोजी भारतात आपली नवीन ‘V29 सीरीज’ लॉन्च करेल, अशी घोषणा Vivo India ने केली आहे. या सिरीज अंतर्गत Vivo V29 आणि Vivo V29 Pro स्मार्टफोन आणले जातील. या सीरिजमध्ये 50MP AI सेल्फी कॅमेरा आणि 50MP रीअर कॅमेरा सेटअप असेल. त्याबरोबरच, Vivo V29 आणि V29 Pro मध्ये 80W फास्ट चार्जिंगसह येण्याची शक्यता आहे.
Google Pixel 8 सिरीज 4 ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. ज्या अंतर्गत Pixel 8 आणि Pixel 8 Pro मॉडेल आणले जातील. हे दोन्ही मोबाईल भारतातही उपलब्ध होतील आणि त्याची विक्री ऑक्टोबरमध्येच सुरू होणार आहे. Pixel 8 आणि Pixel 8 Pro दोन्हीची किंमत भारतात 50,000 रुपयांच्या वर ठेवली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
फोल्डेबल Oppo फोन Find N3 Flip चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. हा मोबाईल भारतात ऑक्टोबरच्या मिडमध्ये लाँच केला जाईल. या फोनमध्ये 6.80 FHD+ AMOLED मेन डिस्प्ले आणि 3.26 इंच लांबीचा AMOLED कव्हर डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी, यात रियर पॅनलवर 50MP+32MP+8MP आणि 32MP फ्रंट कॅमेरा आहे.