Upcoming Smartphones in June 2024: ‘या’ महिन्यात भारतात लाँच होणार भारी स्मार्टफोन्स, बघा यादी

Updated on 03-Jun-2024
HIGHLIGHTS

Vivo X Fold 3 Pro फोन भारतात 6 जून रोजी लाँच होणार आहे.

Xiaomi 14 CIVI हा या सिरीजचा भारतात लाँच होणारा पहिला फोन आहे.

Realme GT 6 कंपनीचा AI फ्लॅगशिप फोन असणार असल्याचे समोर आले आहे.

Upcoming Smartphones in June 2024: 2024 वर्षाचा जुन महिना नुकताच सुरु झालेला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मे महिना स्मार्टफोन्सच्या नावावर होता. गेल्या महिन्यात Google Pixel 8A पासून Samsung Galaxy F55 5G पर्यंत अनेक स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले होते. त्यानंतर जून महिना देखील स्मार्टफोन लाँचसाठी खूप खास असणार आहे. या मे महिन्यात असे अनेक फोन आणि मालिका आहेत, जे भारतात पहिल्यांदाच दाखल होणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात जून 2024 मध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी-

Vivo X Fold 3 Pro

Vivo X Fold 3 Pro हे कंपनीचे पहिले फोल्डेबल डिव्हाइस आहे, जे भारतात लवकरच लाँच होणार आहे. होय, हा फोन भारतात 6 जून रोजी लाँच होणार आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 8.03 इंच लांबीच्या LTPO AMOLED डिस्प्ले सह येऊ शकतो, ज्याचा कव्हर डिस्प्ले 6.53 इंच लांबीचा असण्याची शक्यता आहे. याशिवाय, हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येईल, अशी अपेक्षा आहे. आगामी फोन Flipkart, Amazon आणि Vivo साइटवरून ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Xiaomi 14 CIVI

Xiaomi 14 CIVI हा भारतात लाँच होणारा पहिला फोन आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, याआधी कंपनीने CIVI सीरीज अंतर्गत कोणताही फोन भारतात लाँच केलेला नाही. हा फोन भारतात 12 जून रोजी लाँच होणार आहे. लीक फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.55 इंच लांबी डिस्प्ले असू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 8s Gen प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो.

Realme GT 6

कंपनीने अलिडकेच Realme GT 6T स्मार्टफोन भारतात लाँच केला. त्यानंतर आता Realme GT 6 फोन भारतात लाँच केला जाणार आहे. मात्र, आगामी फोनची लाँच डेट अजूनही पडद्याआड आहे. लाँचआधीच या फोनबद्दल अनेक लीक पुढे आले आहेत. हा कंपनीचा AI फ्लॅगशिप फोन असणार असल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच, हा फोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनची बॅटरी 5,500mAh असण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :