Upcoming Smartphones In December 2024: अखेर 2024 ला निरोप देण्याची वेळ आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय बाजरात अनेक जबरदस्त आणि विशेष वैशिष्ट्यांसह फोन्स लाँच करण्यात आले आहेत. आता वर्षाच्या येत्या काही दिवसांत डिसेंबर महिन्याला सुरुवात होत आहे. पुढील महिन्यात देखील भारतात अनेक उत्कृष्ट मोबाइल फोन्स लाँच केले जातील, जे प्रत्येक बजेटमध्ये सर्वोत्तम पर्याय प्रदान करतील. डिसेंबर 2024 मधील या आगामी फोनची यादी पुढीलप्रमाणे-
Also Read: काय सांगताय? 40 इंच Android Smart TV फक्त 11 हजार रुपयांमध्ये उपलब्ध! पहा सर्वोत्तम ऑफर
डिसेंबरची सुरुवात फ्लॅगशिप स्मार्टफोन नव्या iQOO 13 स्मार्टफोन लाँचने होणार आहे. लक्षात घ्या की, iQOO 13 हा 6.82-इंच लांबीचा Q10 2K 144Hz अल्ट्रा आयकेअर LTPO AMOLED डिस्प्लेला सपोर्ट करणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. हा मोबाइल स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरवर लाँच केला जाईल. भारतात हा फोन मजबूत 6,000mAh बॅटरीसह येईल, चार्जिंगसाठी 120W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान उपलब्ध असेल. फोटोग्राफीसाठी यात 32MP सेल्फी आणि 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा असेल.
Redmi Note 14 5G फोन भारतात 9 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. हा फोन 6.67 इंच 120Hz फुलएचडी + AMOLED डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन डायमेंसिटी 7025 अल्ट्रा प्रोसेसरवर काम करेल, जो 12GB रॅमसह भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP LYT-600 ड्युअल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा असेल. तसेच, पॉवर बॅकअपसाठी, यात 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 5,110mAh बॅटरी असेल.
Redmi Note 14 सिरीजअंतर्गत Note 14 Pro देखील 9 डिसेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. भारतीय बाजारात हा फोन 6.67 इंच लांबीच्या 1.5K OLED स्क्रीनवर लाँच केला जाऊ शकतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा मोबाइल 12GB रॅमसह MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसरवर काम करतो. फोटोग्राफीसाठी, यात 50MP LYT-600 ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 20MP सेल्फी कॅमेरा असेल. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 5,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
Redmi Note 14 Pro Plus हा ब्रँडच्या नवीनतम नोट सिरीजमधील सर्वात पॉवरफुल मोबाइल फोन आहे. जो भारतात 9 डिसेंबर रोजी लाँच केला जाईल. हा फोन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच लांबीच्या 1.5K OLED डिस्प्लेवर लॉन्च केले जाऊ शकते. यात हायपर OS सह Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर प्रदान केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP+50MP+8MP रियर कॅमेरा आणि 20MP सेल्फी कॅमेरा दिसू शकतो. तर,पॉवर बॅकअपसाठी, हा स्मार्टफोन 6,000mAh बॅटरीला सपोर्ट करेल, ज्यामध्ये 90W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान उपलब्ध असेल. मात्र, सिरीजअंतर्गत येणाऱ्या फोन्सचे सर्व कन्फर्म स्पेक्स लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.