Upcoming Smartphones in India: Nothing, Google इ. सह भारतात धुमाकूळ घालायला नवीन स्मार्टफोन्स सज्ज

Upcoming Smartphones in India: Nothing, Google इ. सह भारतात धुमाकूळ घालायला नवीन स्मार्टफोन्स सज्ज
HIGHLIGHTS

भारतात नवीन स्मार्टफोन्स धुमाकूळ घालायला सज्ज झाले आहेत.

iPhone ची आगामी आणि बहुप्रतीक्षित सीरीज या वर्षी सप्टेंबरमध्ये सादर केली जाऊ शकते.

Nothing चा आगामी फोन अधिकृतपणे 11 जुलै रोजी देशामध्ये लाँच केला जाणार आहे.

2023 च्या सुरुवातीच्या महिन्यात बरेच जबरदस्त 5G स्मार्टफोन लाँच झाले आहेत. या वर्षाची सुरुवात आता संपत आली आहे आणि नव्या सुरुवातीसह भारतात नवीन स्मार्टफोन्स धुमाकूळ घालायला सज्ज झाले आहेत. होय, देशात अनेक नवीन आणि जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. याबाबत आम्ही खास यादी देखील तयार केली आहे.

iPhone 15 Series 

iPhone ची आगामी आणि बहुप्रतीक्षित सीरीज या वर्षी सप्टेंबरमध्ये सादर केली जाऊ शकते. नवीन लाइनअपमधील सर्व मॉडेल्स पंच-होल डिस्प्ले डिझाइनसह येण्याची अपेक्षा आहे. लीक्सचा दावा आहे की, iPhone 15 ची किंमत 80,000 रुपयांच्या श्रेणीत असण्याची अपेक्षा आहे. तर, प्रो मॉडेल्स अधिक एक्सपेन्सिव्ह असतील.  

Nothing Phone (2) 

Nothing चा हा आगामी फोन अधिकृतपणे 11 जुलै रोजी भारत आणि इतर देशांमध्ये लाँच केला जाणार आहे. नथिंग फोन (2) ची किंमत 40,000 ते 45,000 रुपयां अंतर्गत असण्याची शक्यता आहे. नवीन 5G फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट, 6.7-इंच स्क्रीन आणि 4700mAh बॅटरीसह येईल, याबाबत कंपनीने पुष्टी केली आहे. 

OnePlus Nord 3 

OnePlus ने घोषणा केली आहे की, ते आपला आगामी स्मार्टफोन Nord 3 लवकरच भारतात आणणार आहेत. OnePlus Nord 3 ची भारतात किंमत 30,000 रुपयांच्या अत्नर्गत असण्याची शक्यता आहे. लीक्सनुसार, हा स्मार्टफोन 1.5K रिझोल्यूशनसह 6.74-इंच लांबीचा डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. त्याबरोबरच, डिव्हाइस MediaTek Dimensity 9000 SoC सह सुसज्ज असेल. 

Google Pixel 8 

Google ची आगामी Pixel 8 सिरीज ऑक्टोबर 2023 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये Tensor G3 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये फोटोग्राफी करण्यासाठी जबरदस्त कॅमेरा स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. म्हणजेच कमी प्रकाशात चांगले फोटो घेण्यासाठी, Pixel 8 सिरींजमध्ये 50MP Samsung GN2 ISOCELL वाइड कॅमेरा सेन्सर मिळणार, असे म्हटले जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo