नवीन वर्ष सुरु होताच टेक विश्वात लेटेस्ट स्मार्टफोन्स सिरीजने धुमाकूळ घातला होता. जानेवारी 2024 मध्ये Samsung Galaxy S24 सिरीज, OnePlus 12 सिरीज, Poco X6 सिरीज आणि Realme 12 Pro सिरीज इ. अनेक रोमांचक स्मार्टफोन लाँच झाले. त्यानंतर, नुकतेच फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे आणि या महिन्यात देखील अनेक नवीन Smartphones लाँच होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे या महिन्यात MWC 2024 होणार आहे. MWC (Mobile World Congress) हा जगातील सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी इव्हेंट्सपैकी एक आहे. हा इव्हेंट 26 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान बार्सिलोनामध्ये होणार आहे. या महिन्यात लाँच होणाऱ्या आगामी स्मार्टफोन्सची यादी पुढीलप्रमाणे.
आगामी iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन 22 फेब्रुवारीला भारतात लाँच होत आहे. या फोनची प्री-ऑर्डर 8 फेब्रुवारीपासून सुरू होईल. Snapdragon 8 Gen 2 सह 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेजसह सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड लेन्सचा समावेश असेल.
Xiaomi चा हा स्मार्टफोन Xiaomi 14 सीरीज मध्ये जोडला जाईल, जो मागील वर्षी चीनमध्ये लाँच झाला होता. हा स्मार्टफोन MWC बार्सिलोना दरम्यान जागतिक स्तरावर सादर केले जाण्याची अपेक्षा आहे. Xiaomi India ने अलीकडेच Leica सोबतची भागीदारी उघड करणारा एक टीझर पोस्ट केला आहे. ऑनलाइन लीक्सनुसार, हा स्मार्टफोन क्वाड-कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. हे पूर्णपणे फ्लॅगशिप डिव्हाइस असेल.
Honor X9b फोन भारतात 15 फेब्रुवारीला लाँचसाठी सज्ज आहे. भारतीय बाजारात Honor च्या पुनरागमनानंतर Honor X9b हा या कंपनीचा दुसरा स्मार्टफोन असेल. हा स्मार्टफोन जागतिक स्तरावर उपलब्ध आहे, त्यामुळे या फोनचे फीचर्स आधीपासूनच उपलब्ध आहेत. फोटोग्राफीसाठी, हा फोन 108MP प्रायमरी कॅमेरा, 5MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरच्या समर्थनासह येईल.
नथिंग फोन (2a) MWC बार्सिलोना येथे जागतिक स्तरावर लॉन्च होण्याची देखील अपेक्षा आहे. डिव्हाइस MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरला सपोर्ट करू शकतो, जो 12GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेजसह पेयर केला जाईल. कंपनीने अलीकडेच या फोनची टीज सुरू केली आहे. मात्र, अद्याप त्याच्या लाँचबद्दल अधिकृतपणे खुलासा करण्यात आलेला नाही.