Upcoming Smartphones in December 2024: या महिन्यात अनेक बहुप्रतीक्षित फोन्स भारतात होणार लाँच, पहा यादी

Upcoming Smartphones in December 2024: या महिन्यात अनेक बहुप्रतीक्षित फोन्स भारतात होणार लाँच, पहा यादी
HIGHLIGHTS

2024 च्या शेवटच्या महिन्यात देखील अनेक कंपन्या भारतात नवे स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज

iQOO 13 हा स्मार्टफोन भारतात 3 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे.

आगामी Redmi Note 14 सिरीजच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी

Upcoming Smartphones in December 2024: या वर्षीच्या शेवटच्या महिन्याचा आज पहिला दिवस म्हणजेच 1 डिसेंबर आहे. या यावर्षी अनेक स्मार्टफोन पॉवरफुल स्मार्टफोन आणि स्मार्टफोन जगतात अनेक आकर्षक टेक्नॉलॉजीज उदयास आले आहेत. शेवटच्या महिन्यात देखील अनेक स्मार्टफोन निर्माता आपले नवे स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाले आहेत. होय, डिसेंबर महिन्यात अनेक स्मार्टफोन कंपन्या भारतीय बाजारात त्यांचे फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहेत. पाहुयात यादी-

Also Read: Smartphones launched In November 2024: नुकतेच लाँच झाले नवे जबरदस्त स्मार्टफोन्स, पहा यादी

iqoo 13 india launching details

iQOO 13

गेल्या अनेक दिवसांपासून टेक विश्वात iQOO 13 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा सुरु आहे. हा स्मार्टफोन भारतात 3 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. हा फोन iQOO India वेबसाइट आणि Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. या फोनकरता डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील लाईव्ह झाली आहे. कंपनी या फोनमध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा देईल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. फोनमध्ये नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज असेल. गेमिंग दरम्यान फोन थंड ठेवण्यासाठी फोनमध्ये VC कुलिंग सिस्टम देखील असेल. तसेच Legend Edition आणि Nardo Grey चे दोन पर्याय फोनमध्ये उपलब्ध असतील.

Redmi Note 14 सिरीज

Redmi Note 14 सिरीजच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी अलीकडेच करण्यात आली आहे. ही सिरीज भारतात 9 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Redmi Note 14 Pro+ हा या सिरीजमधील प्रीमियम स्मार्टफोन असेल. प्रो प्लस व्यतिरिक्त, या सीरीजमध्ये Redmi Note 14 आणि Redmi Note 14 Pro फोन देखील असतील. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP फ्लॅगशिप सेन्सर असेल, यामध्ये अनेक AI फीचर्स असतील.

Upcoming Smartphones in December 2024:

Vivo X200 सिरीज

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या आगामी स्मार्टफोन Vivo X200 सिरीजच्या भारतीय लाँचची पुष्टी करण्यात आली आहे. लक्षात घ्या की, कंपनीने अद्याप या फोनची लाँच डेट जाहीर केलेली नाही. ही सिरीज डिसेंबरमध्येच लाँच होईल, असे बोलले जात आहे. या सिरीजमध्ये ZEISS इमेजिंग क्षमता दिले जातील. 200MP ZEISS API Telephoto सेन्सरसह भारतात येणारा हा पहिला फोन असेल. तसेच, यात दुहेरी फ्लॅगशिप चिप्स MediaTek Dimensity 9400 आणि V3+ समाविष्ट असतील. याशिवाय, फोन Vivo India आणि Amazon द्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo