Upcoming Smartphones in August: या महिन्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन्स, Google, Vivo सारखे फोन्स समाविष्ट 

Upcoming Smartphones in August: या महिन्यात भारतात लाँच होणार जबरदस्त स्मार्टफोन्स, Google, Vivo सारखे फोन्स समाविष्ट 
HIGHLIGHTS

ऑगस्ट 2024 मध्ये अनेक नवीन स्मार्टफोन्स भारतीय बाजरात लाँच केले जातील.

बहुप्रतीक्षित Google Pixel 9 सिरीज भारतीय बाजारात 14 ऑगस्ट रोजी लाँच होणार

Vivo V40 सिरीज देखील ऑगस्टमध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या यादीमध्ये समाविष्ट

Smartphones Launch in August 2024: जुलै महिना भारतीय बाजारात स्मार्टफोन्स लाँचच्या बाबतीत अगदी महत्त्वाचा ठरला. अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध स्मार्टफोन कंपन्यांनी आपले लेटेस्ट स्मार्टफोन गेल्या महिन्यात भारतात सादर केले. दरम्यान अशी बातमी आहे की, ऑगस्ट 2024 मध्ये देखील Google, Vivo, Motorola यासह अनेक उत्तम स्मार्टफोन्स भारतात लाँच होणार आहेत. या यादीमध्ये Pixel 9, Vivo V40 series, Motorola Edge 50, Poco M6 Plus सारखे प्रीमियम आणि एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सचा समावेश आहे. पहा यादी-

Also Read: 50MP सेल्फी कॅमेरासह Nothing Phone (2a) Plus फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 50 India launched set for August 1 check confirmed details

Motorola Edge 50

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ऑगस्टमध्ये आपला Edge 50 स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन भारतात 1 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. अहवालानुसार, या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा pOLED डिस्प्ले आहे. परफॉर्मन्ससाठी Qualcomm Snapdragon 7 Gen 1 चिपसेट असेल. स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर यात 256GB पर्यंत स्टोरेज क्षमता असलेली वापर चेंबर कूलिंग सिस्टम देखील आहे. फोनबद्दल सविस्तर माहिती फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येईल.

Vivo V40 सिरीज

Vivo V40 सिरीज देखील ऑगस्टमध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आहे. या सिरीजला BIS सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन ZEISS-ट्यून कॅमेरासह लाँच केला जाऊ शकतो. V40 आणि V40 Pro हे त्यांच्या विभागातील सर्वात स्लिम उपकरणे आहेत, असा कंपनीचा दावा आहे. स्मार्टफोनची बॅटरी 5,500mAH असण्याची शक्यता आहे. ही सिरीज भारतात 7 ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.

google pixel 9 series smartphones लवकरच भारतीय बाजरात लाँच

Google Pixel 9 सिरीज

Google Pixel 9 सिरीज भारतीय बाजारात 14 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात येणार आहे. गुगलचा इंडिया स्पेसिफिक ‘मेड फॉर गुगल इव्हेंट’ भारतात 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपले चार स्मार्टफोन लाँच करणार आहे. लीक रिपोर्टनुसार, कंपनी पहिल्यांदा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करू शकते. या सिरीज अंतर्गत Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Pixel 9 Pro Fold यांचा समावेश आहे.

iQOO 9s 5G

iQOO 9s 5G हा आगामी स्मार्टफोन 4 ऑगस्ट रोजी लाँच केला जाऊ शकतो. हा फोन कंपनी मिड बजेटमध्ये सादर करेल, अशी अपेक्षा आहे. लीकनुसार, हा फोन 6.78 इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्लेमध्ये येईल. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाईल. त्याबरोबरच, परफॉर्मन्ससाठी Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट असेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP Sony LYT600 सेन्सर देण्यात येईल. आकर्षक सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo