Upcoming Smartphones in April 2025: बजेट ते एक्सपेन्सिव्ह सर्व स्मार्टफोन्स ‘या’ महिन्यात होणार लाँच, पहा यादी

Upcoming Smartphones in April 2025: बजेट ते एक्सपेन्सिव्ह सर्व स्मार्टफोन्स ‘या’ महिन्यात होणार लाँच, पहा यादी
HIGHLIGHTS

नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असून या महिन्यात अनेक स्मार्टफोन्स लाँच होत आहेत.

Motorola, Vivo, iQOO इ. ब्रँड्सचे स्मार्टफोन या महिन्यात लाँच होणार आहेत.

Motorola Edge 60 Fusion 5G फोन भारतात 2 एप्रिल रोजी सादर केला जाईल.

Upcoming Smartphones in April 2025: नववर्ष 2025 वर्षाची पहिली तिमाही संपली असून, या कालावधीत अनेक जबरदस्त आणि बहुप्रतीक्षित स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत भारतात अनेक लो बजेट आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्सदेखील लाँच करण्यात आले आहेत. आता नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असून या महिन्यात अनेक स्मार्टफोन्स लाँच होत आहेत. लक्षात घ्या की, Motorola, Vivo, iQOO इ. ब्रँड्सचे स्मार्टफोन या महिन्यात लाँच होणार आहेत. पहा यादी-

Motorola Edge 60 Fusion

Motorola च्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. Motorola Edge 60 Fusion 5G फोन भारतात 2 एप्रिल रोजी लाँच केला जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा भारतातील पहिला MediaTek Dimensity 7400 फोन असेल, ज्यामध्ये 12GB RAM देखील असेल. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP LYT 700C ट्रिपल रियर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा असेल. पॉवर बॅकअपसाठी, 68W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज 5,500mAh बॅटरी दिली जाईल. हा फोन मिड बजेटमध्ये सादर केला जाईल.

Motorola Edge 60 Fusion (Upcoming Smartphones in April 2025)
Motorola Edge 60 Fusion

Vivo T4 5G

Vivo T4 5G फोन Flipkart वर टीज करण्यात आला आहे. मात्र, फोनची लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7S Gen 3 प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी, यात 90W ची फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दिले जाऊ शकते. Vivo T4 5G फोन 6.67-इंच लांबीच्या फुल HD+ क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. मात्र, हा फोन लाँच झाल्यावरच कन्फर्म फीचर्स पुढे येतील.

iQOO Z10

iQOO Z10 5G फोन 11 एप्रिल रोजी भारतात लाँच होईल. हा देखील एक मध्यम बजेट डिव्हाइस असेल, ज्याची किंमत सुमारे 20,000 रुपये असण्याची अपेक्षा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंगसह 7300mAh बॅटरी देखील असेल, ज्याची कंपनीने पुष्टी केली आहे. फोटोग्राफीसाठी,50MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि 16MP चा सेल्फी सेन्सर उपलब्ध असू शकतो. मात्र, हा फोन लाँच झाल्यावरच कन्फर्म फीचर्स आणि किंमत पुढे येतील.

Vivo V50e

Vivo चा आणखी एक नवीन स्मार्टफोन Vivo V50e एप्रिलच्या सुरुवातीला लाँच होऊ शकतो. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, लीक्सनुसार, हा मोबाईल मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसरवर लाँच केला जाऊ शकतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 90W फास्ट चार्जिंग आणि 5600mAh बॅटरी असू शकते. तर, फोटोग्राफीसाठी या Vivo 5G फोनच्या पुढील आणि मागील दोन्ही पॅनलवर 50MP कॅमेरा मिळू शकतो. हा फोन लाँच झाल्यावरच कन्फर्म फीचर्स आणि किंमत पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo