मार्च महिना संपत आला आहे आणि लवकरच एप्रिल महिन्याची सुरुवात होणार आहे. एप्रिल महिना सुरू होताच सतत Smartphones लाँच होणार आहेत. होय, स्मार्टफोन निर्माता कंपन्या एप्रिल महिन्यात भारतात एकामागून एक अनेक फोन लाँच करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यामध्ये, काही स्मार्टफोन्सच्या लाँच डेटची आधीच पुष्टी झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात एप्रिलमध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोनची संपूर्ण यादी-
फ्लॅगशिप किलरचा बहुप्रतीक्षित OnePlus Nord CE 4 स्मार्टफोन भारतात 1 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता लाँच केला जाईल. या फोनची समर्पित मायक्रोसाइट कंपनीच्या साइटवर लाइव्ह करण्यात आली आहे. याद्वारे फोनची अनेक तपशील समोर आले आहेत. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज असेल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम आणि 256 GB स्टोरेज उपलब्ध असेल. पॉवरसाठी या फोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.
Realme 12X 5G फोन भारतात 2 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. हा फोन Flipkart वरून खरेदी करता येईल. या फोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील लाइव्ह करण्यात आली आहे. फोनच्या किमतीबद्दल कंपनीने पुष्टी केली आहे की, हा फोन 12,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाईल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Realme फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा FHD डिस्प्ले, Mediatek Dimensity 6100+ प्रोसेसर, 50MP AI कॅमेरा उपलब्ध आहे.
Moto Edge 50 Pro फोन भारतात 3 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. हा फोन Flipkart वरून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याबरोबरच, या फोनचे अनेक फिचर्स Flipkart वर लाइव्ह देखील झाले आहेत. या Moto फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा 1.5K 144Hz डिस्प्ले असेल. याशिवाय, फोन स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.