2023 या वर्षीचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा वर्ष टेक स्मार्टफोन जगतात अगदी महत्त्वाचा आणि नाविन्यपूर्ण होता. अनेक नवनवीन स्मार्टफोन टेक्नॉलॉजीज या वर्षी उदयास आल्या आहेत. आता अखेर डिसेंबर महिन्यात देखील काही नवीन आणि जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच होण्यास सज्ज झाले आहेत. होय, OnePlus, Honor सारख्या टॉप ब्रँड्सचे स्मार्टफोन्स पुढील महिन्यात लाँच होणार आहेत. बघा यादी-
आगामी OnePlus 12 हा फोन 4 डिसेंबरला लाँच होण्याची शक्यता आहे. होय, कंपनी 10 व्या वर्धापन दिनानिमित्त असलेल्या कार्यक्रमादरम्यान हा फोन लाँच करेल, असे सांगण्यात येत आहे. प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने OnePlus 12 चा फर्स्ट लुक देखील आपल्या अधिकृत X म्हणजे ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे.
Redmi 13C हा स्मार्टफोन भारतात 6 डिसेंबर रोजी लाँच केला जाईल, अशी अधिकृत घोषणा कंपनीने केली आहे. फोनचे प्रोडक्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह केले गेले आहे. यामध्ये तुम्हाला ‘Notify me’ चे बटण देखील दिसेल. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. Redmi 13C ची भारतीय किंमत 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते.
iQOO 12 5G अलीकडेच टेक विश्वात लाँच करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन पुढील महिन्यात 12 डिसेंबर रोजी भारतात लाँच केला जाईल. कंपनीने चीनी बाजारात iQOO 12 आणि iQOO 12 Pro 5G सादर केले आहेत. मात्र, केवळ त्याचे स्टॅंडर्ड मॉडेल iQOO 12 भारतात लाँच करण्यात येईल.
Honor 100 सिरीजमध्ये Honor 100 आणि Honor 100 Pro या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. Honor 100 हा नवीन Snapdragon 7 Gen 3 चिपसेटसह येणारा पहिला हँडसेट आहे, असे म्हटले जात आहे. हा स्मार्टफोन देखील डिसेंबर 2023 मध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सपैकी एक आहे.