Samsung Galaxy Z Flip FE: साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung स्वस्त फ्लिप स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आगामी Samsung Galaxy Z Flip FE स्मार्टफोन हा फ्लॅगशिप Galaxy Z Flip सिरीजमधील एक परवडणारा स्मार्टफोन असेल. कंपनीने या आगामी फ्लिप स्मार्टफोनची माहिती अद्याप शेअर केलेली नाही. मात्र, लीक रिपोर्ट्समध्ये फोनचे अनेक तपशील समोर आले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Samsung Galaxy Z Flip FE चे अपेक्षित तपशील-
Also Read: आगामी Vivo Y300 चे भारतीय लाँच कन्फर्म! स्टायलिश लुकसह मिळतील Powerful फीचर्स
लोकप्रिय टिपस्टरने त्याच्या अधिकृत X Twitter अकाउंटवरून ट्विट केले आहे की, Samsung Galaxy Z Flip SE मध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर आढळू शकतो. टिपस्टरनुसार हा आगामी फ्लिप स्मार्टफोन Samsung Galaxy S24 आणि Galaxy S24 Plus स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध असलेल्या Exynos 2400 प्रोसेसरद्वारे सुसज्ज असेल.
वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन स्वस्त किमतीत लाँच करण्यात येईल. दरम्यान, काही मागील अहवाल पाहिल्यास, फोनची किंमत कमी ठेवण्यासाठी ते टोन्ड-डाउन अंतर्गत फीचर्स देऊ शकतात. 2025 मध्ये, Galaxy Z Flip सिरीजचे क्लॅमशेल-शैलीचे फोल्डेबल मॉडेल अधिक परवडणारे प्रकार म्हणून बाजारात आणले जाईल, अशी अपेक्षा आहे. त्याबरोबरच, टिपस्टरने असेही म्हटले आहे की, Galaxy Z Flip 7 मध्ये Exynos 2500 आढळू शकते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, सॅमसंगचा सध्याचा फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन लाइनअप Snapdragon 8 Gen 3 ने सुसज्ज आहे.
Samsung च्या मते, ते “एन्ट्री बॅरियर कमी करण्याचे मार्ग शोधत आहे, जेणेकरून अधिक ग्राहकांना फोल्ड करण्यायोग्य म्हणजेच फोल्डेबल स्मार्टफोन्सचा खरोखर अनुभव घेता येईल.” त्यामुळे, Galaxy Z Flip आणि Z Fold स्मार्टफोन्सच्या अधिक किफायतशीर प्रकारांच्या विकासाबाबतच्या अफवा काही प्रमाणात खऱ्या असू शकतात. मात्र, आतापर्यंत कंपनीने या फोनच्या लॉन्चिंग डेटबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.