Samsung Galaxy S25 Ultra: अपेक्षित लाँच तारीख, भारतीय किंमत आणि इतर सर्व तपशील, वाचा सविस्तर 

Samsung Galaxy S25 Ultra: अपेक्षित लाँच तारीख, भारतीय किंमत आणि इतर सर्व तपशील, वाचा सविस्तर 
HIGHLIGHTS

Samsung चे लव्हर्स Samsung Galaxy S25 Ultra च्या भारतीय लाँचची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे.

Samsung Galaxy S25 Ultra फोनबद्दल बहुतांश माहिती लीक झाली आहे.

Samsung Galaxy S25 सिरीज 22 जानेवारी 2025 रोजी घोषित केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चे लव्हर्स Samsung Galaxy S25 Ultra च्या भारतीय लाँचची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. आगामी सिरीजबद्दल बहुतांश माहिती आधीच ऑनलाईन लीक झाली आहे. ब्रँडचे पुढचे फ्लॅगशिप उपकरण Galaxy S25 Ultra हे Galaxy S24 Ultra पेक्षा मोठ्या सुधारणांसह आणला जाईल, असे सांगितले जात आहे. होय, सुधारित कॅमेऱ्यांपासून ते डिझाईनपर्यंत या आगामी प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनबद्दल माहिती पुढे आली आहे. जाणून घेऊयात सर्व तपशील-

Also Read: अगदी निम्म्या किमतीत मिळतोय Samsung Galaxy S23 FE फोन, 2025 सुरु होताच मोठी Price Cut!

samsung galaxy s25 ultra expected features

Samsung Galaxy S25 Ultra ची अपेक्षित लाँच डेट आणि किंमत

Samsung सामान्यत: जानेवारीमध्ये आपला वर्षातील मोठा इव्हेंट Galaxy Unpacked दरम्यान नवे फ्लॅगशिप डिव्हाइस लाँच करते. लीक्स सूचित करतात की, Galaxy S25 सिरीज 22 जानेवारी 2025 रोजी घोषित केली जाईल. Samsung ने Galaxy S25 Ultra ची अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, 2023 मध्ये भारतात 1,29,999 रुपयांना लाँच झालेल्या Galaxy S24 Ultra पेक्षा याची किंमत जास्त असेल, असे बोलले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीनतम शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर यात सज्ज असल्यामुळे फोनची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy S25 Ultra चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार, Samsung Galaxy S25 Ultra फोनमध्ये 6.9 इंच लांबीपर्यंत डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, Galaxy S25 Ultra मध्ये टायटॅनियम फ्रेम आणि कर्व एजेससह आकर्षक डिझाईन असल्याची अफवा आहे. Samsung Galaxy S25 Ultra सह त्याचा कॅमेरा गेम उंचावण्याची अपेक्षा आहे. हा फोन Qualcomm च्या Snapdragon 8 Elite प्रोसेसरद्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 16GB पर्यंत RAM आणि 1TB स्टोरेजसह जोडलेले आहे.

Samsung Galaxy S25 Series

फोटोग्राफीसाठी, डिव्हाइसमध्ये 200MP प्राथमिक सेन्सरसह क्वाड-कॅमेरा सेटअप असेल. यात नवीन 100MP स्पेस झूम फिचर देखील असू शकते. तर, अल्ट्रा-वाइड कॅमेरा 50MP आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा मिळेल अशी अपेक्षा आहे. एवढेच नाही तर, 3x ऑप्टिकल झूमसह 10MP लेन्स देखील सेटअप पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. फोन 45W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी ठेवण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, या फोनमध्ये Qi2 मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo