साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung च्या आगामी Samsung Galaxy S25 सिरीजच्या लाँचची प्रतीक्षा अख्ख्या टेक विश्वात सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, येत्या 22 जानेवारी रोजी Galaxy Unpacked Event 2025 आयोजित केले गेले आहे. या इव्हेंटमध्ये Galaxy S25 सीरीज लाँच केली जाऊ शकते. या सिरीजअंतर्गत Samsung Galaxy S25, Galaxy S25 आणि Galaxy S25 Ultra हे तीन स्मार्टफोन लाँच केले जातील.
Also Read: OnePlus 13 5G First Sale: लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोनची पहिली सेल भारतात सुरु, पहा Best ऑफर्स
आम्ही तुम्हाला सांगतो की, ताज्या लीक झालेल्या अहवालानुसार कंपनी या सिरीज स्लिम मॉडेल देखील आणू शकते. त्याबरोबरच, आगामी स्मार्टफोन सीरिजच्या लाँचपूर्वी त्याची अपेक्षित किंमत लीक करण्यात आली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Galaxy Unpacked Event 2025 साठी प्री-रिझर्वेशन सुरू झाले आहे. चला तर मग जाणून घेऊयात, ताज्या अहवालात पुढे आलेली Samsung Galaxy S25 सिरीजची लीक किंमत-
पुढे आलेल्या लीक अहवालामध्ये, युरोपमधील रिटेल सूचीनुसार Samsung Galaxy S25 च्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 964 युरो म्हणजेच अंदाजे 85,000 रुपये इतकी असेल. तर, 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,026 युरो म्हणजेच अंदाजे 91,000 रुपये असू शकते. तर, अखेर या फोनच्या टॉप 512GB स्टोरेज व्हेरिएंट 1,151 युरो म्हणजेच अंदाजे रुपये 1,01,000 मध्ये लाँच केला जाईल, अशी शक्यता आहे.
दुसरीकडे, Galaxy S25+ चा 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,235 युरो म्हणजेच अंदाजे 1,09,000 रुपये असू शकते. तर, टॉप 512GB स्टोरेज वेरिएंट 1,359 युरो म्हणजेच अंदाजे 1,20,000 रुपयांमध्ये लाँच केला जाईल, अशी अपेक्षा आहे. अखेर, या सिरीजचा अल्ट्रा व्हेरिएंट 1,557 युरो म्हणजेच अंदाजे 1,38,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो. वरील सर्व किमती लीक झालेल्या किमती आहेत, फोनच्या खऱ्या किमती Samsung Galaxy S25 सिरीज लाँच झाल्यावरच पुढे येतील.
लीकनुसार, Samsung Galaxy S25 सिरीजचे स्मार्टफोन्स आईसी ब्लु, मिंट, नेव्ही आणि सिल्व्हर शेडमध्ये लाँच केले जातील. अल्ट्रा फोन अधिक प्रीमियम कलर ऑप्शन्स टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम ग्रे आणि टायटॅनियम सिल्व्हर ब्लू सह लाँच केला जाईल.