Samsung Galaxy M55 चे Important फीचर्स लीक! नवा फोन लवकरच भारतात होणार लाँच। Tech News 

Samsung Galaxy M55 चे Important फीचर्स लीक! नवा फोन लवकरच भारतात होणार लाँच। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M55 लवकरच भारतात होणार लाँच

Samsung Galaxy M55 5G चे पेज अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह

हा फोन भारतीय बाजारात 20 ते 25 हजार रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Samsung चा आगामी Samsung Galaxy M55 गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लाँचबद्दल चर्चेत आहे. या स्मार्टफोनचे अनेक फोटो ऑनलाईनरित्या लीक झाले आहेत. मागील काही दिवसांपासून आगामी स्मार्टफोनबद्दल अनेक बातम्या सुरु आहेत. आता ताज्या अहवालानुसार, फोनचे काही महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. हे Xiaomi, Vivo, Realme, Lava आणि Oppo सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोनशी जबरदस्त स्पर्धा करेल. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy M55 चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स आणि इतर महत्त्वाची माहिती-

हे सुद्धा वाचा: New Smartphones launched: नुकतेच लाँच झालेले प्रसिद्ध कंपन्यांचे जबरदस्त स्मार्टफोन्स, किंमत 20 हजार रुपयांअंतर्गत। Tech News

Samsung Galaxy M55 चे भारतीय लाँच

अलीकडेच Samsung Galaxy M55 5G चे पेज अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झाले. याद्वारे हे फोन लवकरच लाँच होणार असल्याचे समजत आहे. मात्र, फोनच्या लॉन्चिंग किंवा किंमतीबाबत सॅमसंगकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लीकवर विश्वास ठेवला तर, हा फोन भारतीय बाजारात 20 ते 25 हजार रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy M55 5G
Samsung Galaxy M55 5G

Samsung Galaxy M55 चे लीक स्पेक्स

अलीकडेच आलेल्या ताज्या अहवालानुसार, Samsung Galaxy M55 चे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. आगामी फोन 6.7-इंच लांबीच्या सुपर AMOLED + डिस्प्लेसह येईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल.
फोन नवीनतम Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात OIS ला सपोर्ट करणारा 50MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो सेन्सर असेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP कॅमेरा दिला जाऊ शकतो.

याव्यतिरिक्त, Samsung Galaxy M55 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 किंवा Exynos 1380 प्रोसेसर दिला जाऊ शकतात. पॉवरसाठी फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. तर सुरक्षिततेसाठी फोनमध्ये फेस लॉक/अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. पुढील पाच वर्षांसाठी फोनला सॉफ्टवेअर अपडेट्स मिळत राहतील. हा फोन लाईट ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. मात्र, Samsung Galaxy M55 चे कन्फर्म फीचर्स आणि किंमत हा फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo