आगामी Samsung Galaxy M20 स्मार्टफोन 5000mAh च्या मोठ्या बॅटरी सह होऊ शकतो लॉन्च

आगामी Samsung Galaxy M20 स्मार्टफोन 5000mAh च्या मोठ्या बॅटरी सह होऊ शकतो लॉन्च
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M20 5000mAh बॅटरी सह दिसला आहे जी Galaxy Note 9 पेक्षा 1000mAh ने जास्त आहे.

महत्वाचे मुद्दे

  • Galaxy M20 मध्ये दिली जाईल 5000mAh ची बॅटरी
  • एंड्राइड 8.1 ओरियो सह लॉन्च होईल Galaxy M20
  • युरोपात सर्वात आधी लॉन्च होईल Galaxy M20 स्मार्टफोन

सॅमसंग आपल्या M सीरीजच्या स्मार्टफोन्स वर काम करत आहे आणि बोलले जात आहे की हि Galaxy J, On आणि C सीरीज मिळून तयार केली जाईल. या आगामी सीरीजच्या दोन फोन्स Galaxy M10 आणि M20 बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत आणि मागील एका रिपोर्ट मधून M20 च्या डिजाइनबद्दल माहिती मिळाली आहे. एका नवीन रिपोर्ट मधून डिवाइसच्या इंटरनल हार्डवेयरची माहिती मिळाली आहे. रिपोर्टनुसार, Galaxy M20 स्मार्टफोन 5000mAh च्या बॅटरी सह येऊ शकतो आणि डिवाइस मध्ये 6.0 इंचाचा LCD IPS डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तसेच नवीन रिपोर्ट मधून Galaxy M20 मधील वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेची माहिती मिळाली आहे.

Galaxy M20 सॅमसंगच्या एक्सीनोस 7885 SoC आणि 3GB रॅम सह येईल. ऑप्टिक्स पाहता स्मार्टफोन 13MP आणि 5MP च्या रियर कॅमेरा आणि 8MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह येईल. डिवाइस आधी UK, पोलंड, जर्मनी, फ्रांस आणि स्कॅन्डेनेव्हिया मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो पण डिवाइस भारतात कधी लॉन्च केला जाईल हे अजून समजले नाही. असे बोलले जात आहे की हा आगामी फोन 200 Euro मध्ये लॉन्च केला जाईल जे भारतीय करंसीनुसार जवळपास Rs 15,985 आहेत.

Galaxy M20 चया फ्रंट पॅनलचा फोटो पण लीक झाला होता ज्यातून डिवाइसच्या डिजाइन एलिमेंटचा खुलासा झाला होता. इमेजनुसार, डिवाइसच्या डिस्प्लेच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच असण्याची शक्यता आहे. हि वॉटरड्रॉप नॉच डिजाइन भारतात सर्वात आधी Oppo F9 आणि F9 Pro हँडसेट मध्ये दिसली होती. सॅमसंग ने आपल्या डेवलपर कांफ्रेंस मध्ये Infinity O, Infinity U, Infinity V इत्यादी दाखवल्या होत्या पण वॉटरड्रॉप नॉच बद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती.

काही दिवसांपूर्वी M20 गीकबेंच लिस्टिंग मध्ये पण दिसला होता ज्यावरून समजते की डिवाइस 32GB इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला जाईल. याचा प्रोसेसर 1.6GHz वर क्लोक्ड असू शकतो आणि स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रो एसडी कार्डचा सपोर्ट पण दिला जाईल. बेंचमार्क लिस्टिंग वरून फोन एंड्राइड 8.1 ओरियो वर लॉन्च केला जाऊ शकतो हे देखील समजले आहे नंतर हा एंड्राइड पाई सह सॅमसंगच्या वन UI वर अपडेट केला जाईल.

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo