प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने आगामी Redmi Note 14 सिरीजची लाँच डेट आधीच जाहीर केली आहे. ही सिरीज भारतात येत्या 9 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. या सिरीजमध्ये कंपनी Redmi Note 14 5G, Redmi Note 14 Pro 5G आणि Redmi Note 14 Pro+ 5G हे स्मार्टफोन समाविष्ट आहेत. कंपनीने लाँचपूर्वीच Redmi Note 14 Pro+ 5G फोनच्या उपलब्धतेची पुष्टी केली आहे. या फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon वर लाइव्ह झाली आहे. याद्वारे फोनचे लुक आणि महत्त्वाचे तपशील देखील पुढे आले आहेत.
Also Read: आगामी Moto G35 च्या लाँचपूर्वीच किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक, तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवा फोन?
आगामी Redmi Note 14 5G स्मार्टफोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट Amazon वर लाईव्ह झाली आहे. Amazon लिस्टिंगनुसार हा फोन भारतात 9 डिसेंबरला लॉन्च होईल. कंपनीने आधीच Redmi Note 14 सीरीजच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. या लिस्टिंगद्वारे, फोनच्या लाँचपूर्वीच डिझाइन आणि अनेक प्रमुख फीचर्स उघड झाली आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Redmi Note 14 5G देखील या Redmi Note 14 सिरीजचा भाग असेल.
वर सांगितल्याप्रमाणे, Amazon लिस्टिंगद्वारे या फोनचे डिझाइन आणि फीचर्स समोर आले आहेत. त्यावरून आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनला बॅक कर्व बॉडी आणि स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल मिळणार आहे. फोनमध्ये सुपर ब्राइट डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्क्वेअर कॅमेरा मॉड्युलमध्ये तीन रिंग दिसू शकतात, ज्यामध्ये वेगवेगळे सेन्सर्स असतील. यासोबतच मॉड्यूलमध्ये LED फ्लॅश देण्यात येणार आहे. Amazon सूचीद्वारे, फोन ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शन्समध्ये मिळेल, असे देखील पुढे आले आहे.
त्याबरोबरच, या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्राथमिक कॅमेरा असेल, याची देखील पुष्टी लिस्टींगद्वारे झाली आहे. एवढेच नाही तर, या फोनमध्ये अनेक AI कॅमेरा फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. विशेष म्हणजे कंपनी AiMi सह या फोनमध्ये AI फीचर्स मिळवू शकतात. फोनच्या डिस्प्लेमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग सेन्सर्ससाठी पंच-होल कटआउट देखील उपलब्ध असेल.