Exciting! Redmi Note 13 Pro ची भारतीय किंमत लाँचपूर्वीच Online लीक, तुमच्या बजेटमध्ये बसेल का आगामी स्मार्टफोन? Tech News

Updated on 21-Dec-2023
HIGHLIGHTS

Redmi Note 13 Pro भारतात 4 जानेवारी 2024 रोजी लाँच होणार

Redmi Note 13 5G आणि Redmi Note 13 Pro+ 5G फोन देखील भारतीय बाजारपेठेत दाखल होतील.

Redmi Note 13 Pro ची अपेक्षित भारतीय किंमत इंटरनेटवर आली आहे.

Xiaomi Redmi Note 13 Pro भारतात 4 जानेवारी 2024 रोजी लाँच होणार आहे, असे कंपनीने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे. लक्षात घ्या की, या सिरीजअंतर्गत Redmi Note 13 5G आणि Redmi Note 13 Pro+ 5G फोन देखील भारतीय बाजारपेठेत दाखल होतील. आगामी स्मार्टफोन्सबद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत. ताज्या लीकनुसार, नवीन Redmi Note स्मार्टफोन भारतात येण्यापूर्वीच, त्यापैकी एक Redmi Note 13 Pro ची अपेक्षित भारतीय किंमत इंटरनेटवर आली आहे.

हे सुद्धा वाचा: Upcoming Smartphones in 2024: जानेवारीमध्ये भारतात लाँच होणार सर्वात जबरदस्त फोन, Best फीचर्ससह होणार दाखल। Tech News

Redmi Note 13 Pro ची लीक भारतीय किमंत

आगामी Redmi Note 13 Pro फोनची किंमत प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने ट्विटरवर शेअर केली आहे. लीकमध्ये फोनच्या बॉक्सची किंमत 32,999 रुपये दिस आहे. ही किंमत Redmi Note 13 Pro च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.

मात्र, लक्षात घ्या की भारतीय बाजारपेठेत कोणताही स्मार्टफोन बॉक्सच्या किमतीपेक्षा कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध होतो. त्यामुळे, 12GB रॅमसह Redmi Note 13 Pro भारतात 29,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो, अशी अपेक्षा आहे.

Redmi Note 13 Pro चे स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, Redmi Note 13 Pro मध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन AMOLED पॅनेलवर बनवली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटच्या समर्थनासह येते. प्रोसेसिंगसाठी यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. चीनमध्ये हा स्मार्टफोन 8GB रॅम, 12GB रॅम आणि 16GB रॅम या तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. तर, फोनचे इंटर्नल स्टोरेज 128GB ते 512GB पर्यंत आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 200MP Samsung ISOCELL HP3 प्रायमरी सेन्सरला, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळतो. तर, सेल्फीसाठी तुम्हाला यात 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 5100mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :