अलीकडेच Redmi A4 5G स्मार्टफोन इंडियन मोबाईल काँग्रेस IMC 2024 दरम्यान सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये कंपनीने सांगितले की, हा कंपनीचा नवीनतम बजेट 5G स्मार्टफोन होय. कंपनी हा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करणार आहे, अशी देखील माहिती मिळाली आहे. मात्र, ताज्या अहवालानुसार, या फोनची नेमकी किंमत लीक झाली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन मागील वर्षी लाँच झालेल्या Redmi A3 4G स्मार्टफोनपेक्षा थोडा महाग असू शकतो. तसेच, यात 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G कनेक्टिव्हिटी देखील मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या फोनशी संबंधित सर्व तपशील-
Also Read: नव्या रंगरूपात BSNL दाखल! जुने लोगो आणि टॅगलाइन बदलली, 7 नवीन आणि जबरदस्त सेवा सुरु
एका अहवालानुसार, आगामी Redmi A4 5G फोनची किंमत लीक झाली आहे. या रिपोर्टनुसार, कंपनी या फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,499 रुपये इतकी निश्चित करू शकते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, मागील वर्षी कंपनीने Redmi A3 4G फोनचे 3GB आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 7,299 रुपये किमतीत लाँच करण्यात आले आहोत. तर, फोनच्या 4GB रॅम व्हेरिएंटची किमत 8,299 रुपये इतकी होती.
वर सांगितल्याप्रमाणे, आगामी Redmi A4 5G स्मार्टफोन IMC 2024 दरम्यान सादर करण्यात आला आहे. यासह फोनचे अनेक फिचर्स आणि डिझाइन समोर आले आहेत. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 6.7 इंच लांबीच्या HD+ डिस्प्ले सह येतो, डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका असेल. याशिवाय, उत्तम कार्यक्षमतेसाठी हा फोन स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे.
Redmi A4 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असणे, अपेक्षित आहे. फोटोग्राफीसाठी, यात 50MP प्रायमरी कॅमेरा असेल. लक्षात घ्या की, कॅमेरा सेक्शनमधील इतर सेन्सर्सची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देखील दिले जाईल.