आगामी Realme P2 Pro 5G च्या भारतातील लॉन्च तारखेची पुष्टी! बजेट किमतीत मिळतील Powerful फीचर्स
Realme ने काही काळापूर्वी भारतात आपली नवी P-सिरीज लाँच केली होती.
आता Realme ने P सिरीजचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे.
Realme P2 Pro 5G डिव्हाइस पुढील आठवड्यात लाँच होणार आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने काही काळापूर्वी भारतात आपली नवी P-सिरीज लाँच केली. ही सिरीज कंपनीने बजेट रेंजअंतर्गत सादर केली आहे. आता अखेर Realme ने P सिरीजचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत, Realme P2 Pro 5G स्मार्टफोन लाँच होणार असल्याचे सांगितले गेले आहे. ब्रँडने नवीन टीझर जारी करून अधिकृतपणे डिव्हाइसची लाँच तारीख शेअर केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात आगामी Realme P2 Pro 5G फोनचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: 50MP कॅमेरासह Samsung Galaxy A06 फोन भारतात लाँच, किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी
Realme P2 Pro 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स
Say hello to #realmeP2Pro5G, packed with the only 80W charging in the segment that keeps you ahead of the game. ⚡
— realme (@realmeIndia) September 4, 2024
Are you ready to elevate your smartphone experience?
Launching 13th Sept, 12 Noon.
Know more: https://t.co/fwXUuY4HJp #FastestCurvedDisplayPhone pic.twitter.com/FpskB8cTHK
Realme ने अधिकृतपणे घोषित केले आहे की, Realme P2 Pro 5G डिव्हाइस 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12:00 वाजता भारतात लाँच केला जाईल. तर, या टिझरद्वारे फोनबद्दल अनेक तपशील देखील पुढे आले आहेत. तुम्ही वरील टीझरमध्ये पाहू शकता की, स्मार्टफोनमध्ये 80W अल्ट्रा फास्ट चार्जिंग असेल याची पुष्टी झाली आहे. नवीन उपकरण सर्वात वेगवान कर्व डिस्प्लेसह येणार आहे. होय, Realme P2 Pro 5G मोबाईलमध्ये, वापरकर्त्यांना 120Hz पर्यंत रीफ्रेश रेट आणि AMOLED पॅनल ऑफर केले जाईल.
अधिकृत टीझरमध्ये या फोन हिरव्या रंगात दिसत आहे. मोबाईलच्या फ्रंट पॅनलवर कर्व डिझाइन आणि गोल्डन फ्रेम देखील स्पष्टपणे दृश्यमान आहे. फोनमध्ये पंच होल कटआउट देखील दिसला आहे. तर, डिव्हाइसमध्ये एक मोठा कर्व चौरस आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आहे. ज्यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आणि LED फ्लॅश देखील आहे.
Realme P2 Pro 5G चे अपेक्षित तपशील
Realme P2 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सुमारे 20,000 रुपयांच्या श्रेणीत प्रवेश मिळू शकतो. आगामी Realme P2 Pro चार स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध असू शकतो. ज्यामध्ये 8GB+128GB, 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB सारखे पर्याय मिळू शकतात. तर, आगामी Realme P2 Pro स्मार्टफोन Chameleon Green आणि Eagle Grey सारख्या दोन कलर ऑप्शन्समध्ये मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile