आगामी Realme P1 Speed ​​5G फोन ‘या’ दिवशी होणार भारतात दाखल, किंमत असेल 15,000 रुपयांपेक्षा कमी?

Updated on 09-Oct-2024
HIGHLIGHTS

Realme आता P1 सिरीजमध्ये एक नवीन मोबाइल फोन सादर करत आहे.

नवा मोबाइल फोन 'Realme P1 Speed ​​5G' नावाने लाँच केला जाईल.

नवा Realme फोन दिवाळीपूर्वी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच Realme P2 Pro फोन भारतात लाँच केला. हा फोन कंपनीने मिड-बजेट रेंजमध्ये सादर केला होता. त्यानंतर, आता कंपनीने आपल्या नव्या बजेट स्मार्टफोनची घोषणा केली आहे. Realme आता P1 सिरीजमध्ये एक नवीन मोबाइल फोन ‘Realme P1 Speed ​​5G’ लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रियलमी फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Energy 5G चिपसेट उपलब्ध असेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme P1 Speed ​​5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

Also Read: आकर्षक Motorola Razr 50 फ्लिप फोन सवलतीसह खरेदी करण्याची संधी, तब्बल 14,000 रुपयांचा Discount

Realme P1 Speed ​​5G ची भारतीय लाँच डेट

Realme ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवरून आगामी फोनच्या लाँचबाबत माहिती दिली आहे. Realme P1 Speed ​​5G फोन भारतीय बाजारात पुढील आठवड्यात 15 ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहे. लक्षात घ्या की, Realme P1 5G आणि Realme P1 Pro 5G नंतर या सिरीजचे हे तिसरे मॉडेल असेल. हा Realme फोन दिवाळीपूर्वी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Realme P1 Speed ​​5G फोन हा लोअर मिड बजेट डिवाइस असेल ज्याची किंमत जवळपास 15 हजार रुपयांपर्यंत ठेवली जाऊ शकते. सध्या 6GB + 128GB सह Realme P1 5G देखील याच किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. Realme P1 Speed ​​5G चे अपेक्षित तपशील देखील पुढे आले आहेत. Realme P1 Speed ​​5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300 Energy 5G प्रोसेसरवर कार्य करेल.

Realme P2 Pro

Realme P2 Pro

वर सांगितल्याप्रमाणे, अलीकडेच Realme P2 Pro फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. Realme P2 Pro स्मार्टफोन तीन प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच्या 8GB रॅम मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ कर्व Samsung AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120 Hz रिफ्रेश रेट आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी, यात 50MP LYT-600 प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 32MP सेल्फी शूटर आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,200mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :