Realme ने नुकतेच म्हणजेच बुधवारी Realme GT 6T स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. त्यानंतर, Realme ने आज आगामी Narzo N65 5G स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म केली आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, Realme Narzo सीरीजचे स्मार्टफोन्स खूप पसंत केले जातात. याआधी, कंपनीने Narzo सिरीजमध्ये Narzo 70x 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनी या सिरीजमध्ये आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात Realme Narzo N65 5G स्मार्टफोनचे लॉन्चिंग डिटेल्स-
Realme Narzo N65 5G स्मार्टफोन 28 मे 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. Realme ने कंपनीच्या अधिकृत साईटवर Realme Narzo N65 5G चे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरद्वारे समजते की, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 5G चिपसेट सह येणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीने अद्याप फोनची किमंत जाहीर केलेली नाही. एवढेच नाही तर, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर देखील Realme Narzo N65 5G चे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
कंपनीने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये आगामी स्मार्टफोनची मागील बाजू पाहिली जाऊ शकते. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल, असे सांगितले जात आहे. तर, Realme ने मागील बाजूस एक राउंड कॅमेरा मॉड्यूल दिला आहे, ज्यामध्ये तुम्हाला फ्लॅशदेखील मिळेल. याव्यतिरिक्त, पॉवर आणि व्हॉल्यूम कंट्रोल करण्यासाठी फोनच्या उजव्या बाजूला एक बटण आहे. तसेच, पॉवर बटणवरच फिंगरप्रिंट सेन्सर असेल, अशी अपेक्षा आहे.
कंपनीने लाँचपूर्वीच पुष्टी केली आहे की, आगामी स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 5G चिपसेटसह येणारा हा पहिला स्मार्टफोन असेल. याशिवाय, कंपनीने असेही म्हटले आहे की फोनला IP54 रेटिंग मिळाली आहे. याव्यतिरिक्त, हे बेस्ट रेनवॉटर स्मार्ट टॉर्चसह येईल. हा फोन गोल्डन कलरमध्ये येईल, असे पोस्टरवरून लक्षात येते. सध्या या आगामी फोनबद्दल एवढीच माहिती समोर आली आहे. कंपनी भविष्यात फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स उघड करेल.