प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ची Narzo सिरीज ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कंपनीने अलीकडेच Realme Narzo 70 5G आणि Realme Narzo 70 Pro 5G हे दोन स्मार्टफोन मॉडेल्स लाँच केले. त्यानंतर, आता कंपनी Realme Narzo 70 Turbo 5G च्या भारतीय लाँचसाठी देखील सज्ज झाली आहे. हा स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत उतरणार आहे, जिथे तो Xiaomi, Vivo, Oppo आणि Samsung सारख्या ब्रँडच्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. जाणून घेऊयात Realme Narzo 70 Turbo 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
स्मार्टफोन ब्रँड Realme च्या मते Realme Narzo 70 Turbo 5G फोन पुढील आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे. विषेश म्हणजे या उपकरणाची डिझाईन मोटर-स्पोर्ट्सपासून प्रेरित आहे. तुम्ही पाहू शकता की, आगामी स्मार्टफोनच्या बॅकपॅनलमध्ये ब्लॅक आणि येलो कलर ऑप्शन्सचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे या फोनला आकर्षक आणि हटके लुक मिळतो.
हे आतापर्यंतचे सर्वात पातळ उपकरण असेल, असा कंपनीचा दावा आहे. या फोनला मीडियाटेककडून शक्तिशाली प्रोसेसर मिळेल. होय, Realme चा आगामी स्मार्टफोन Narzo 70 Turbo 5G Mediatek Dimensity 7300 Energy 5G चिपसेट सह येईल. याशिवाय, हेडसेटमध्ये पॉवरफुल बॅटरी, AMOLED डिस्प्ले आणि मोठे स्टोरेज असणे अपेक्षित आहे.
लीकनुसार, Realme Narzo 70 Turbo ची किंमत 15 ते 20 हजार रुपयांच्या दरम्यान ठेवली जाऊ शकते. हे उपकरण ग्राहकांना अनेक स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्समध्ये असे म्हटले जात आहे की, Realme च्या नवीन स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज असेल. फोटो क्लिक करण्यासाठी, हँडसेटमध्ये OIS सपोर्ट करणारा 50MP कॅमेरा असेल. समोर 8MP कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी फास्ट चार्जिंगसह प्रदान केली जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखी फीचर्स असतील.