Realme GT 7 Pro असेल कंपनीचा सर्वात Powerful स्मार्टफोन, AI च्या पॉवरसह आणखी काय मिळेल विशेष?

Updated on 28-Oct-2024
HIGHLIGHTS

Realme GT 7 Pro लवकरच भारतीय बाजारात सादर केला जाईल.

Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरसहकंपनीने Realme GT7 Pro ला 'AI powerhouse' म्हटले आहे.

Realme कंपनीने Realme GT7 Pro ला 'AI powerhouse' म्हटले आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme सध्या आपल्या सर्वात शक्तिशाली स्मार्टफोनवर काम करत आहे. मागील काही काळापासून टेक विश्वात Realme च्या आगामी Realme GT 7 Pro ची चर्चा सुरु आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन नवीनतम Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह लाँच केला जाईल. या प्रोसेसरसह Realme GT 7 Pro कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल. Realme चा नवीन फोन पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेत लाँच केला जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता Realme GT 7 Pro चे कन्फर्म तपशील जाणून घेऊयात.

Also Read: Apple च्या स्वस्त iPhone ची लाँच तारीख लीक! आगामी फोन Powerful AI फीचर्ससह असेल सज्ज, पहा डिटेल्स

Realme GT 7 Pro चे भारतीय लॉन्चिंग तपशील

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Realme GT 7 Pro चीनमध्ये 4 नोव्हेंबर रोजी लाँच होईल. काही दिवसांनी हा मोबाईल फोन भारतीय बाजारात देखील दाखल होणार आहे. भारतीय लाँचसाठी कंपनीने अद्याप कोणतीही निश्चित लाँच तारीख घोषित केलेली नाही. परंतु, Realme नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय बाजारात हा फोन लाँच करेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

AI फीचर्स

कंपनीने Realme GT7 Pro ला ‘AI powerhouse’ म्हटले आहे. हा फोन realme UI 6.0 वर लॉन्च केला जाईल, जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. यामध्ये AI स्केच टू इमेज, AI Motion Deblur, AI गेम सुपर रिझोल्यूशन आणि AI टेलिफोटो अल्ट्रा क्लॅरिटी सारख्या AI फीचर्सचा समावेश असेल. याच्या मदतीने इमेज एडिटिंग, स्केच मेकिंग आणि मोबाईल गेमिंग सोपे आणि उपयुक्त होईल.

Realme GT 7 Pro चे अपेक्षित तपशील

Realme GT 7 Pro स्मार्टफोन मायक्रो-क्वाड-कर्व डिझाइनवर तयार केला जाईल ज्यामध्ये स्लोपिंग साईड्स दिसतील. कंपनीने सांगितले की, “Samsung चा इको OLED प्लस पॅनल फ्रंट पॅनलवर वापरण्यात आला आहे आणि बॅक पॅनल मल्टी-लेयर हॉट-फोर्जिंग एजी प्रक्रियेद्वारे बनवण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे हा मोबाइल तापमान आणि दाब सहन करण्यास सक्षम असेल.” फोनमध्ये 6.7 इंच लांबीची 8T LTPO 1.5K स्क्रीन असेल.

वर सांगितल्याप्रमाणे, Realme GT 7 Pro हा भारतात लाँच होणारा Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर असलेला पहिला फोन असेल. हा फोन ट्रिपल हायपरइमेज+ रिअर कॅमेरा सिस्टमवर लाँच होऊ शकतो. कंपनीने म्हटले आहे की, या फोनमध्ये 50MP Sony IMX882 टेलिफोटो सेन्सर असेल, जो पेरिस्कोप लेन्स म्हणून देखील कार्य करेल. या मोबाईलमध्ये AI टेलिफोटो अल्ट्रा क्लॅरिटी फीचर उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन 6,500mAh बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :