आगामी Realme GT 6 फोनची लाँच डेट Confirm! ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल, बघा सर्व लीक्स 

आगामी Realme GT 6 फोनची लाँच डेट Confirm! ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल, बघा सर्व लीक्स 
HIGHLIGHTS

आगामी Realme GT 6 स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर

Realme GT 6 भारतात 20 जून रोजी लाँच होणार आहे.

Realme GT मोबाईल भारतात शॉपिंग साइट Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Realme ने अलीकडेच आपला नवा ‘GT सिरीज’ स्मार्टफोन Realme GT 6 टेक विश्वात लाँच करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर, टेक प्रेमी आणि मोबाईल वापरकर्ते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आज कंपनीने Realme GT 6 स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. जाणून घेऊयात Realme GT 6 स्मार्टफोनचे भारतीय लॉन्चिंग तपशील आणि सर्व लीक्स-

Also Read: Upcoming Smartphones in June 2024: ‘या’ महिन्यात भारतात लाँच होणार भारी स्मार्टफोन्स, बघा यादी

Realme GT 6 भारतीय लाँच डेट

Realme GT 6 च्या भारतीय लाँच डेटबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. Realme GT 6 भारतात 20 जून रोजी लाँच होणार आहे. ही फोनची ग्लोबल लॉन्चिंग असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Realme GT 6 स्मार्टफोन भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या इव्हेंटद्वारे संपूर्ण जगात सादर केला जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

लक्षात घ्या की, हे प्रक्षेपण 20 जून रोजी दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. हा नवीन Realme GT मोबाईल भारतात शॉपिंग साइट Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध असेल. फोनचा लाँच इव्हेंट ब्रँडच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहता येणार आहे.

Realme GT 6 चे सर्व लीक स्पेसिफिकेशन्स

Realme GT 6 चे सर्व स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक झाले आहेत. लीकनुसार, Realme GT6 फोन 6.78-इंच लांबीच्या पंच-होल डिस्प्लेसह लॉन्च केला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. प्रोसेसिंगसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रदान केला जाऊ शकतो. फोन शक्तिशाली 5,500mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जी 120W फास्ट चार्जिंगसह मिळण्याची अपेक्षा आहे.

realme gt 6

फोटोग्राफीसाठी, या फोनच्या मागील पॅनलवर 50MP Sony IMX882 OIS मुख्य सेन्सर आणि 8MP IMX355 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स मिळू शकतो. त्याबरोबरच, फ्रंट पॅनलवर 32MP Sony IMX615 सेल्फी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेराला सपोर्ट करतो. हा Sony IMX615 सेन्सर आहे, जो F/2.45 अपर्चरवर कार्य करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo