अलीकडेच Realme ने भारतीय बाजारपेठेसाठी नवीन 5G फोन टीज केला होता. त्यानंतर, अखेर ब्रँडने बुधवारी पुष्टी केली आहे की, डिव्हाइसचे नाव Realme C67 5G असे असणार आहे. 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारा हा ब्रँडचा पहिला C-सिरीज म्हणजेच चॅम्पियन-सिरीज स्मार्टफोन असेल. एवढेच नाही, तर कंपनीने या नव्या स्मार्टफोनची लाँच डेट देखील उघड केली आहे. लाँच डेटसह फोनची डिझाईन आणि पहिली झलक देखील जाहीर करण्यात आली आहे. बघुयात सविस्तर-
हे सुद्धा वाचा: Jio ने आणला धमाकेदार प्लॅन! Unlimited बेनिफिट्ससह एक नव्हे तर दोन-दोन OTT सबस्क्रिप्शन उपलब्ध। Tech News
Realme ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर एक अधिकृत पोस्टर रिलीज केले आहे. त्यावरून, या फोनबाबत मूलभूत माहिती पुढे आली आहे. Realme C67 5G ते 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. त्याबरोबरच, डिवाइसच्या मागील बाजूस एक राउंड कॅमेरा मॉड्यूल दिसू शकतो. ज्यामध्ये 50MP प्रायमरी, एक सेकंडरी कॅमेरा आणि एक LED फ्लॅश दिला जाऊ शकतो.
तसेच, आत साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर आहे असेल. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल आणि तो 5G 6nm चिपसेटने सुसज्ज असेल, याबाबत कंपनीने पुष्टी देखील केली आहे. हा आगामी फोन ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल, असे पोस्टर इमेजद्वारे समोर आले आहे.
अशा अफवा आहेत की, हा फोन डायमेंसिटी 6100+ चिपसेटसह सुसज्ज असू शकते. कंपनीने या डिव्हाइसबद्दल इतर कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. पण लीकनुसार, या स्मार्टफोनची किंमत 12,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. तर, डिव्हाइस 4GB, 6GB आणि 8GB रॅम व्हेरिएंट आणि 128GB स्टोरेजसह येतील, अशी अपेक्षा आहे.
Realme चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहेत. ही स्मार्टफोन निर्माता सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे बातम्यांमध्ये असते. दरम्यान, आज 7 डिसेंबर रोजी Realme आपला दमदार फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 5 Pro चीनमध्ये लाँच करणार आहे.