Realme 14 Pro सिरीजचे भारतीय लाँच कन्फर्म! ‘या’ Powerful फीचर्ससह लवकरच होणार दाखल

Updated on 10-Dec-2024
HIGHLIGHTS

Realme ची आगामी Realme 14 Pro सिरीज लवकरच भारतात लाँच होणार

सिरीजअंतर्गत कंपनी Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ 5G फोन सादर करेल.

Realme 14 Pro मालिकेत AI आधारित इमेज स्टॅबिलायझेशन देखील प्रदान केले जाईल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ची आगामी Realme 14 Pro सिरीज लवकरच भारतात लाँच होणार आहे. या सिरीजअंतर्गत कंपनी Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ 5G फोन सादर करणार, अशी अपेक्षा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सिरीज जुलैमध्ये सादर झालेल्या Realme 13 Pro सिरीजची सक्सेसर असेल, असे बोलले जात आहे. या आगामी स्मार्टफोन सिरीजमधेय अनेक पॉवरफुल फीचर्स आहेत, असे देखील सांगितले गेले आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme 14 Pro सिरीजचे भारतीय लॉन्चिंग तपशील-

Also Read: लेटेस्ट Moto G35 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी

Realme 14 Pro सिरीजचे भारतीय लाँच

Realme India ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या Twitter हँडलद्वारे Realme 14 Pro सिरीज भारतात लाँच केल्याची पुष्टी केली आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे Realme 14 Pro सीरीजला टीज करण्यास सुरुवात केली आहे. त्याबरोबरच, कंपनीने हा फोन पॉवरफुल Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरने सज्ज असेल, याची देखील पुष्टी करण्यात आली आहे.

Realme 14 Pro सिरीजचे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme 14 Pro सिरीजबद्दल अनेक लीक तपशील पुढे आले आहेत. त्यानुसार, कंपनी Realme 14 Pro सीरीज अंतर्गत Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ असे दोन फोन सादर करू शकते. हे दोन्ही स्मार्टफोन्स स्नॅपड्रॅगन 7s Gen 3 प्रोसेसरद्वारे सुसज्ज असतील. याव्यतिरिक्त, या सिरीजमध्ये पेरिस्कोप लेन्स देखील मिळेल, असा देखील अंदाज आहे. तर, विशेष म्हणजे Realme 14 Pro मालिकेत AI आधारित इमेज स्टॅबिलायझेशन देखील प्रदान केले जाईल.

Realme 13 Pro सीरीज

कंपनीने या वर्षी जुलैमध्ये Realme 13 Pro सीरीज लाँच केली होती. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, प्रो प्लस फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP पेरिस्कोप सेन्सर आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर समाविष्ट आहे. तर, प्रो फोनमध्ये 50MP प्राथमिक आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Realme 13 Pro फोनची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये आणि प्रो प्लस फोनची किंमत 32,999 रुपये इतकी आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :