प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने आपल्या आगामी स्मार्टफोन सिरीजच्या लाँचची घोषणा केली आहे. आम्ही आगामी Realme 12 Pro सिरीजबद्दल बोलत आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की, पूर्वी काही रिपोर्ट्समध्ये सूचित करण्यात आले होते की, ही सिरीज 3 जानेवारी 2024 रोजी लाँच होईल परंतु असे झाली नाही. त्यानंतर, आता Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्स TDRA, MIIT आणि TENAA या अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसले आहेत. लक्षात घ्या की, कंपनीने अद्याप त्याची अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नाही.
हे सुद्धा वाचा: iQOO Neo 9 Pro ची भारतीय किंमत लीक, तुमच्या बजेटमध्ये बसेल का फोन? जाणून घ्या सर्व डिटेल्स। Tech News
लीकनुसार, स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल. डिस्प्लेचे पिक्सेल रिझोल्यूशन 2412×1080 असेल. याशिवाय, स्पीड आणि मल्टीटास्किंग फोनमध्ये Octa-Core 2.2GHz चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. लिस्टिंगनुसार हा फोन 6GB, 8GB, 12GB आणि 16GB या चार रॅम व्हेरिएंटमध्ये येईल. यासह, फोनमध्ये 128GB, 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेजचा ऑप्शन असेल.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात 50MP मेन, 32MP दुसरा आणि 8MP तिसरा सेन्सर असेल. तर आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 16MP कॅमेरा दिला जाईल.
लीकनुसार, Realme 12 Pro+ व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी ऑक्टा-कोर 2.4GHz चिपसेट देण्यात येईल. फोटोग्राफीसाठी, या फोनसह 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 4,880mAh बॅटरी दिली जाईल. मात्र, दोन्ही फोनचे सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स फोन लाँच झाल्यानंतरच कन्फर्म होतील.