प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने आपल्या युजर्ससाठी अप्रतिम बातमी आणली आहे. Oppo कंपनीने अखेर घोषणा केली आहे की, ती भारतात आपली नवीनतम ‘Reno 13 सीरीज’ लवकरच सादर करेल. या सिरीजअंतर्गत OPPO Reno 13 आणि OPPO Reno 13 Pro स्मार्टफोन भारतात लाँच केले जातील. Oppo India वेबसाइटवर या सिरीजचे प्रोडक्ट पेज लाईव्ह केले गेले आहे. जिथे आगामी 5G फोनचा फोटो आणि डिझाइन देखील उघड करण्यात आले आहेत.
आगामी Oppo Reno 13 सीरीज भारतात लवकरच लाँच होणार आहे. कंपनीने ब्रँडच्या अधिकृत X (पूर्वीच्या ट्विटर) हँडलद्वारे सिरीजचे लॉन्चिंग टीज केले आहे. वर सांगतिल्याप्रमाणे, प्रोडक्ट पेज देखील कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह केले आहे. या सिरीज अंतर्गत Reno 13 आणि Reno 13 Pro स्मार्टफोन्स देखील लाँच केले जातील. कंपनीने याला OPPO AI फोन म्हटले आहे. लक्षात घ्या की, कंपनीने अद्याप OPPO Reno 13 सिरीजची भारतीय लाँच डेट जाहीर केलेली नाही.
Also Read: AI फीचर्सने सज्ज Redmi 14 Pro+ 5G स्मार्टफोनवर भारी Discount, मिळतेय तब्बल 5000 रुपयांची सूट
ग्लोबल व्हेरिएंट नुसार, Oppo Reno 13 5G फोनमध्ये 6.59-इंच लांबीचा 1.5K अल्ट्रा हाय डेफिनेशन डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. Oppo Reno 13 Pro मध्ये 6.83-इंच लांबीचा 1.5K डिस्प्ले आहे. ही एक कर्व OLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखी फीचर्स आहेत.
प्रोसेसिंगसाठी, या Oppo Reno 13 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek चे डायमेंसिटी 8350 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. तर, प्रो व्हेरिएंटमध्ये MediaTek डायमेंसिटी 8350 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी, Oppo Reno 13 5G च्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह 50MP चा Sony OIS मुख्य सेन्सर आहे, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह कार्य करतो. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आहे.
तर, प्रो व्हेरिएंट देखील ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर, 50 मेगापिक्सेल 3.5X पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स, 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्ससह 50MP IMX890 मुख्य सेन्सर आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
पॉवर बॅकअपसाठी, Oppo Reno 13 5G फोन 5,600 mAh बॅटरीला सपोर्ट करतो, जी 80W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आहे. तर, Oppo Reno 13 Pro मध्ये 5,800 mAh बॅटरी आहे. ही मजबूत बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी, 80W वायर्ड फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे.