प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo स्मार्टफोन मार्केटमधील सर्वात प्रमुख ब्रँडपैकी एक आहे. कंपनीचे अनेक स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये पॉप्युलर आहेत. दरम्यान आता Oppo जागतिक बाजारपेठेत आपला नवीन K12 Plus सादर करून त्याच्या लोकप्रिय K12 सिरीजचा विस्तार करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने चीनमध्ये या नवीन मिड-रेंज स्मार्टफोनची लाँच देता जाहीर केली आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात Oppo ची मजबूत उपस्थिती लक्षात घेता हा आगामी फोन लवकरच भारतात लाँच केला जाईल, अशी अपेक्षा आहे.
Also Read: आगामी Realme P1 Speed 5G फोन ‘या’ दिवशी होणार भारतात दाखल, किंमत असेल 15,000 रुपयांपेक्षा कमी?
आगामी Oppo K12 Plus फोन 12 ऑक्टोबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता चीनी बाजारात लाँच करण्यात येणार आहे. अधिकृत Weibo पोस्टद्वारे या फोनच्या लाँचची पुष्टी करण्यात आली आहे. हँडसेट पिल-शेप्ड मागील कॅमेरा मॉड्यूलने सुसज्ज आहे. ज्यामध्ये लहान आणि सर्क्युलर स्लॉटमध्ये LED फ्लॅश युनिटसह दोन कॅमेरा सेन्सर मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, Weibo पोस्ट पुष्टी करते की, Oppo K12 Plus फोन बेसाल्ट ब्लॅक आणि स्नो पीक व्हाइट कलर ऑप्शन्ससह सादर केला जाऊ शकतो.
Oppo K12 Plus ला एक डिझाइन मिळेल जे काही काळापूर्वी लाँच केलेल्या OnePlus Nord CE4 सारखे दिसेल, अशी अपेक्षा आहे. लीकनुसार, Oppo K12 Plus डिव्हाइस 6.7-इंच लांबीच्या HD+ AMOLED डिस्प्ले पॅनेलसह येऊ शकतो. या डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट देखील दिला जाऊ शकतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 चिपसेटसह सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. यासह तुम्हाला मजबूत परफॉर्मन्स मिळणार आहे. हा फोन 12GB पर्यंत रॅमसह 256GB आणि 512GB दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.
Oppo K12 Plus स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये 50MP प्रायमरी शूटरसह 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळू शकतो. याशिवाय, पॉवर बॅकअपसाठी या डिव्हाइसला 6400mAh बॅटरी मिळण्याची पुष्टी झाली आहे. या फोनमध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. हा फोन Android 14 वर आधारित ColorOS 14 सह कार्य करेल, अशी देखील माहिती मिळाली आहे.