OnePlus Nord CE4 भारतात आज लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. या फोनचे लॉन्चिंग 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होणार आहे. फोनच्या प्लॅटफॉर्मवर कंपनी Nord CE 4 ची किंमत आणि त्याची विक्री तपशील शेअर करेल. या लॉन्च इव्हेंटमध्ये कंपनी Nord CE 4 5G वर उपलब्ध ऑफर्स देखील जाहीर करणार आहे. OnePlus Nord CE4 फोनचे Live स्ट्रीमिंगमध्ये तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट तुमच्या फोनवर बघू शकता.
लीकनुसार, OnePlus Nord CE 4 स्मार्टफोन 8GB RAM वर लॉन्च केला जाईल. हा फोन दोन स्टोरेज प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. जर आपण लीकवर विश्वास ठेवला तर, या OnePlus फोनच्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 26,999 रुपये असेल. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लीकनुसार, OnePlus Nord CE 4 फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असेल, डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. या व्यतिरिक्त, आम्ही तुम्हाला सांगतो की, OnePlus India ने आधीच सांगितले आहे की OnePlus Nord CE4 स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट वर लाँच केला जाईल. तर, हे 2.63 GHz पर्यंत क्लॉक स्पीडने चालू शकते. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB रॅम वर लॉन्च केला जाईल. तर कंपनीने पुष्टी केली आहे की, या फोनमध्ये 8GB व्हर्चुअल रॅम तंत्रज्ञान देखील दिले जाईल, जे मोबाइलच्या फिजिकल रॅमसह 16GB रॅमची पॉवर ऑफर करेल.
फोटोग्राफीसाठी OnePlus फोनमध्ये 50MP Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा असू शकतो, ज्यासह OIS समर्थन देखील मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, Nord CE4 5G फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते. ब्रँडकडून माहिती देण्यात आली आहे की, हा OnePlus मोबाइल 100W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.