Price Leak! लाँचपूर्वीच OnePlus Nord 4 ची किंमत झाली लीक, तुमच्या बजेटमध्ये येणार का नवा स्मार्टफोन?

Updated on 09-Jul-2024
HIGHLIGHTS

आगामी OnePlus Nord 4 स्मार्टफोन 16 जुलै रोजी भारतात लाँच होणार आहे.

प्रसिद्ध 'Techno Ruhez' ने आपल्या X हँडलद्वारे लँडिंग पेजवर लाईव्ह किंमतीचा स्क्रीनशॉट शेअर केला.

OnePlus Nord 4 फोनमध्ये अलर्ट स्लाइडरसारखे अप्रतिम फीचर्स देण्यात येतील.

OnePlus Nord 4: फ्लॅगशिप किलरचा नवा OnePlus Nord 4 16 जुलै रोजी भारतात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन भारतात Amazon प्राइम डे सेलच्या लाँच होणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Nord सीरिजचा हा चौथ्या जनरेशनचा फोन असेल. गेल्या काही दिवसांपासून कंपनी त्याच्या मेटल बॉडी डिझाइनला टीज करत आहे. एवढेच नाही तर, लाँच होण्यापूर्वी या स्मार्टफोनची किंमत देखील आज लीक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात, हा आगामी OnePlus Nord 4 डिवाइस कोणत्या अपेक्षित बजेटमध्ये लाँच होऊ शकतो?

Also Read: बजेट किमतीत भारतात लाँच झाला Redmi 13 5G, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स

OnePlus Nord 4 ची किंमत लीक

समर लाँच इव्हेंटचे लँडिंग पेज OnePlus च्या अधिकृत वेबसाइटवर LIVE झाले आहे. या इव्हेंटदरम्यान, Nord 4, Pad 2, Nord Buds 3 Pro आणि Watch 2R ची झलक दाखवण्यात आली आहे. जरी आतापर्यंत कंपनीने OnePlus Nord 4 स्मार्टफोनची नेमकी किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. परंतु चुकून आगामी फोनची किंमत लँडिंग पेजवर लाईव्ह करण्यात आली होती, जी आता रिमूव्ह केली गेली.

वरील पोस्टनुसार, प्रसिद्ध ‘Techno Ruhez’ ने आपल्या X हँडलद्वारे लँडिंग पेजवर लाईव्ह किंमतीचा स्क्रीनशॉट घेऊन स्मार्टफोनची किंमत लीक केली आहे. त्यानुसार, OnePlus Nord 4 बँक डिस्काउंटसह 27,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असेल. यावर 6 महिन्यांपर्यंतचे नो-कॉस्ट EMI पर्याय उपलब्ध असतील.

OnePlus Nord 4 बद्दल लीक

ताज्या लीकनुसार, OnePlus Nord 4 हँडसेटच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या सेल्फी स्नॅपरसाठी मध्यभागी पंच-होल कटआउट, फ्लॅट एजेस आणि स्क्रीनभोवती थिन बेझल्स दिले जातील. फोनचे व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण उजव्या काठावर दिले जातील. त्याबरोबरच, अलर्ट स्लाइडर डाव्या बाजूला देखील दिसू शकतो. लीक अहवालानुसार, OnePlus Nord 4 ब्लॅक, मिंट आणि व्हाइट/सिल्व्हरमध्ये दिसेल.

याव्यतिरिक्त, या आगामी डिव्हाइसमध्ये 6.74 इंच लांबीचा 1.5K OLED डिस्प्ले दिला जाईल. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, यात Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन 8GB RAM, 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात येईल. फोटोग्राफीसाठी यात 50MP प्राथमिक + 8MP सोबत येण्याची अपेक्षा आहे. तसेच, पॉवरसाठी 5500mAh बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्पीकर, अलर्ट स्लाइडर आणि इतर समाविष्ट असू शकतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :