फ्लॅगशिप किलर OnePlus ब्रँड आपल्या आगामी फोन OnePlus Ace 3 वर काम करत आहे. हा स्मार्टफोन लवकरच बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन प्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल आणि नंतर इतर देशांतील मार्केटमध्ये सादर केला जाईल. या फोनबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु आहेत. ताज्या लीकमध्ये OnePlus Ace 3 चे अनेक महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स आणि अपेक्षित लाँच टाइमलाईन देखील समोर आले आहेत. जाणून घेऊयात सर्व तपशील.
हे सुद्धा वाचा: लेटेस्ट IQOO 12 5G स्मार्टफोनची Sale आजपासून भारतात होणार सुरु, Best ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करण्याची संधी
आगामी OnePlus Ace 3 च्या लाँचबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ताज्या लीकनुसार हा मोबाईल फोन पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. लक्षात घ्या की, काही देशांमध्ये OnePlus Ace 3 स्मार्टफोन OnePlus 12R या नावाने देखील आणला जाऊ शकतो, असा अंदाज देखील काही अहवालांमध्ये वर्तवला जात आहे.
अलीकडेच पुढे आलेल्या अहवालानुसार, आगामी OnePlus Ace 3 स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीची कर्व एज OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा 120Hz रिफ्रेश दर असेल. हा स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. फोनचा टॉप 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे. तर, फोनचा बेस व्हेरिएंट 12GB रॅम सह आणला जाईल.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP चा मुख्य रियर कॅमेरा मिळू शकतो. तर, 32MP टेलीफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स त्याच्या मागील पॅनलवर देखील दिसू शकतात. त्याबरोबरच, OnePlus Ace 3 स्मार्टफोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन 5,500 mAh बॅटरीने सुसज्ज असून 100W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करेल, अशी अपेक्षा आहे.