फ्लॅगशिप किलर OnePlus च्या आगामी स्मार्टफोन OnePlus 13R च्या भारतीय लाँचची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यानुसार, OnePlus 13R स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. स्मार्टफोन अलीकडेच अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला आहे. यामुळे हा फोन लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा स्मार्टफोन चीनमध्ये डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च केला जाईल. तर, ताज्या अहवालात, OnePlus 13R ची अपेक्षित भारतीय लाँच टाइमलाईन देखील पुढे आली आहे.
Also Read: लेटेस्ट Samsung Galaxy S24 5G वर मिळतोय तब्बल 7000 रुपयांचा Discount, पहा Best ऑफर्स
लीक रिपोर्टनुसार, OnePlus चा हा आगामी OnePlus 13R स्मार्टफोन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केला जाणार आहे. लक्षात घ्या की, लवकरच लाँच होणाऱ्या OnePlus 13 ची ही लाईट आवृत्ती असेल. अनेक लीक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, हा फोन मोठ्या बॅटरीसह सज्ज असेल आणि त्याची किंमत OnePlus 13 पेक्षा कमी असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, ग्लोबल सर्टिफिकेशन फोरम GCF लिस्टिंगने उघड केले आहे की, फोन 5G सपोर्टसह येईल.
लीक रिपोर्ट्सनुसार, OnePlus 13R स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच लांबीचा BOE X2 8T LTPO डिस्प्ले असू शकतो. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1.5k असेल. लीकवर विश्वास ठेवला तर, हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह येऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि सेल्फी, व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच, लीकनुसार स्मार्टफोनमध्ये 6300mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, वरील सर्व माहिती ऑनलाईन पुढे आलेल्या लीक अहवालानुसार आहे. OnePlus ने अद्याप फोनच्या लॉन्चिंग तसेच फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. येत्या काळात लवकरच कंपनी याबद्दल घोषणा करू शकते.