आगामी OnePlus 13 असेल कंपनीचा महागडा स्मार्टफोन! लाँचपूर्वीच किंमत Leak, काय मिळेल विशेष?

Updated on 16-Oct-2024
HIGHLIGHTS

OnePlus 13 च्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे.

OnePlus 13 फोनबद्दल अनेक लीक्स सोशल मीडियावर पुढे येत आहेत.

OnePlus 13 जुने मॉडेल म्हणजेच OnePlus 12 पेक्षा महाग असण्याची शक्यता

फ्लॅगशिप किलर कंपनी OnePlus चे भारतात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. चाहते आतुरतेने या फोनची प्रतीक्षा करत आहेत. OnePlus 13 च्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. एवढेच नाही तर, या फोनबद्दल अनेक लीक्स सोशल मीडियावर पुढे येत आहेत. आता या फोनबद्दल आणखी एक लीक पुढे आले आहे. ज्यामध्ये लाँचपूर्वीच या फोनची किंमत लीक झाली आहे.

Also Read: itel ColorPro 5G चा नवा व्हेरिएंट भारतात लाँच! फक्त 7,999 रुपयांमध्ये खरेदीची संधी, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

OnePlus 13 ची किंमत लीक

ताज्या आणि नवीन अहवालानुसार OnePlus 13 जुने मॉडेल म्हणजेच OnePlus 12 पेक्षा महाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, एका प्रसिद्ध चायनीज टिपस्टरने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. चीनी टिपस्टरनुसार, OnePlus 13 च्या 16GB RAM + 512GB स्टोरेज आवृत्तीची किंमत CNY 5200 आणि CNY 5299 दरम्यान असू शकते. तर OnePlus 12 ची तीच आवृत्ती CNY 4799 साठी लाँच करण्यात आली होती.

म्हणजेच नवीनतम फोनची किंमत सुमारे CNY 400-500 म्हणजेच सुमारे 5 हजार रुपयांनी जास्त असेल, अशी शक्यता आहे. मात्र, लक्षात घ्या की, आगामी OnePlus 13 ची खरी किंमत हा फोन लाँच झाल्यावरच पुढे येईल.

OnePlus 13 चे अपेक्षित तपशील

OnePlus 13 मध्ये OnePlus 12 च्या तुलनेत अनेक अपग्रेड्स मिळणार आहेत. आगामी फोनच्या प्रोसेसरबद्दल अनेक चर्चा आहेत. कंपनीचा आगामी फ्लॅगशिप फोन Snapdragon 8 Elite चिपसेट सह येऊ शकतो, असा अंदाज आहे. लीकवर विश्वास ठेवला तर, या फ्लॅगशिप प्रोसेसरसह येणारा OnePlus 13 हा पहिला फोन असेल. ब्रँडनुसार, OnePlus 13 च्या दुसऱ्या जनरेशनमधील 2K ओरिएंटल स्क्रीन किंवा BOE X2 डिस्प्लेला जगातील पहिले DisplayMate A++ प्रमाणपत्र मिळाले आहे, ज्याने तब्बल 21 डिस्प्ले रेकॉर्ड स्थापित केले आहेत.

यामुळे फोनचा परफॉर्मन्स मोठ्या प्रमाणात मजबूत होईल. OnePlus 13 च्या बॅटरीबद्दल देखील बरीच चर्चा सुरु आहे. OnePlus 13 मध्ये मजबूत बॅटरी दिली जाईल, असे सांगितले जात आहे. लीकनुसार, या फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 100W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल, अशी अपेक्षा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, OnePlus च्या जुन्या फोनमध्ये सर्वात पॉवरफुल बॅटरी फक्त 5400mAh आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :