प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus ने OnePlus 13 या फोन अलीकडेच जागतिक बाजारात लाँच केला आहे. दरम्यान, या फोनच्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून टेक विश्वात सुरु आहे. या फोनबद्दल अनेक लीक्स आणि अहवाल सोशल मीडियावर दररोज येत असतात. मात्र, आता हा स्मार्टफोन कंपनीने प्रसिद्ध शॉपिंग साईट Amazon India वर सूचिबद्ध करण्यात आला आहे. मात्र, लॉन्चची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. चला तर मग जाणून घेऊयात Amazon लिस्टिंगद्वारे OnePlus 13 चे पुढे आलेले तपशील-
Also Read: अखेर पॉवरफुल आणि बहुप्रतिक्षीत गेमिंग फोन iQOO 13 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
वर सांगितल्याप्रमाणे, आगामी OnePlus 13 फोन Amazon वर सूचिबद्ध करण्यात आला आहे. यावरूनच लक्षात येते की, लवकरच हा फोन भारतीय बाजरात लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी आणि बहुप्रतीक्षित OnePlus 13 डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी 2025 च्या सुरुवातीला भारतात दाखल होईल, असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, लीकनुसार या फोनची किंमत या स्मार्टफोनची किंमत 64,999 रुपयांपासून सुरू होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. हा फोन ब्लॅक, ब्लु आणि व्हाईट कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
Amazon लिस्टिंगदद्वारे OnePlus 13 फोनबद्दल अनेक तपशील पुढे आले आहेत. OnePlus 13 मध्ये 6.82-इंच लांबीचा 2K LTPO डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी क्रिस्टल शील्ड सुपर सिरॅमिक ग्लास देखील बसवण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या OnePlus मोबाईल फोनमध्ये Snapdragon 8 Elite चिप मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा Qualcomm चा अलीकडेच लाँच झालेला प्रोसेसर आहे. त्याबरोबरच, या हँडसेटमध्ये AI फीचर्स, फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.
स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झालया, या फोनमध्ये 24GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. हा मोबाइल फोन Android 15 आधारित ColorOS 15 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 100w फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्टफोनमध्ये 5G, 4G VoLTE, WiFi, Bluetooth, GLONASS, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट इ. मिळतील. मात्र, या फोनचे योग्य तपशील आणि किंमत फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.