OnePlus 13 Updates: लाँचपूर्वीच आगामी स्मार्टफोनचे डिस्प्ले डिटेल्स Leak! मिळतील इतरही विशेषता 

OnePlus 13 Updates: लाँचपूर्वीच आगामी स्मार्टफोनचे डिस्प्ले डिटेल्स Leak! मिळतील इतरही विशेषता 
HIGHLIGHTS

OnePlus 13 लवकरच जागतिक बाजारपेठेत लाँच होणार

लीकमध्ये आगामी OnePlus 13 फोनबद्दल बरीच माहिती उघड केली जात आहे.

फोनच्या डिस्प्लेमध्ये डोळ्यांवर कमी ताण येण्यासाठी सुपर आय प्रोटेक्शन तंत्रज्ञान देखील असेल.

फ्लॅगशिप किलर OnePlus च्या नंबर सीरिजमध्ये आणखी एक फोन जोडण्यासाठी कंपनी सज्ज होत आहे. कंपनीने या वर्षी जानेवारीमध्ये OnePlus 12 सिरीज सादर केली होती. त्यानंतर, आता OnePlus 13 लवकरच जागतिक बाजारपेठेत लाँच होणार आणि त्यानंतर भारतीय बाजारपेठेत सादर केली जाईल, असे म्हटले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी डिव्हाइसबद्दल माहिती सतत लीक होत आहे.

Also Read: 200MP कॅमेरासह येणारे स्मार्टफोन्स मोठ्या Discount सह उपलब्ध, Amazon वर पडतोय ऑफर्सचा पाऊस

लीकमध्ये आगामी OnePlus 13 फोनबद्दल बरीच माहिती उघड केली जात आहे. दरम्यान, नवीनतम अपडेटमध्ये त्याच्या डिस्प्ले फीचर्सचा खुलासा देखील करण्यात आला आहे. लीकनुसार, हा फोन आजपर्यंतचा सर्वात वेगवान आगामी चिपसेट Snapdragon 8 Elite ने सुसज्ज असेल. जाणून घेऊयात सविस्तर-

oneplus 13 leaks

OnePlus 13 लीक डिस्प्ले डिटेल्स

प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या मते, आगामी OnePlus 13 मध्ये 2K रिझोल्यूशनसह BOE X2 पॅनेल मिळू शकते, ज्याची ब्रँडने आधीच पुष्टी केली आहे. फोनची स्क्रीन 8T LTPO पॅनेल असू शकते आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळू शकतो. आगामी फ्लॅगशिपमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर असल्याचेही सांगितले जात आहे.

एवढेच नाही तर, टिपस्टरनुसार, डिस्प्लेच्या ब्राइटनेसमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे. त्यात डोळ्यांवर कमी ताण येण्यासाठी सुपर आय प्रोटेक्शन तंत्रज्ञान देखील असेल. डिस्प्लेचे कॉर्नर्स कर्व असल्याचे सांगितले जात आहे. स्क्रीनला जगातील सर्वात क्लियर लो ग्रे स्केल इफेक्ट देण्याचा दावा करण्यात आला आहे.

Amazon deals on oneplus phones

OnePlus 13 चे इतर संभावित तपशील

वर सांगितल्याप्रमाणे, OnePlus 13 फोनला प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 8 Elite किंवा Snapdragon 8 Gen 4 चिपसेट मिळेल. लीकनुसार, या फोनमध्ये 24GB रॅम आणि 512GB अंतर्गत स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP Sony LYT808 मुख्य सेन्सर, 50MP LYT600 पेरिस्कोप सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा लेन्ससह फिट असल्याचे सांगितले जाते. तर, लीक अहवालानुसार, डिव्हाइसला 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh+ बॅटरी दिली जाऊ शकते. मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील यामध्ये मिळेल, अशी दाट शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo