फ्लॅगशिप किलर OnePlus ची OnePlus 13 सिरीज लवकरच भारतात लाँच होणार आहे. OnePlus 13 आणि OnePlus 13R हे दोन स्मार्टफोन या सिरीजअंतर्गत लाँच केले जातील. हे दोन्ही दमदार फीचर्ससह आणले जातील. आम्ही तुम्हाला सांगतो की,या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची विक्री Amazon द्वारे केली जाईल. एवढेच नाही तर, या फोन्सची मायक्रो वेबसाईट Amazon वर लाईव्ह करण्यात आली आहे. आता ताज्या रिपोर्टमध्ये, OnePlus च्या या दोन फोनची भारतीय किंमत देखील लॉन्च होण्याआधीच समोर आली आहे. पाहुयात सविस्तर-
Also Read: New Year 2025 Gift Ideas: प्रीमियम Smartwatches वर तब्बल 12,000 रुपयांचा Discount, बेस्ट गिफ्ट ऑप्शन
OnePlus 13 सिरीज येत्या 7 जानेवारी 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे. लोकप्रिय टिपस्टर योगेश ब्रार यांच्या मते, या फोनचे दोन व्हेरिएंट असतील, बेस व्हेरिएंट 12GB रॅमसह 256GB अंतर्गत स्टोरेज आणि टॉप वेरिएंट 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येईल. OnePlus 13 5G भारतात 67,000 ते 70,000 रुपयांच्या दरम्यान लाँच केला जाईल.
तर, दुसरीकडे, OnePlus 13R बोलायचे झाल्यास, हे OnePlus Ace 5 चे रीब्रँडेड मॉडेल असेल, जे अलीकडेच चीनमध्ये लॉन्च केले गेले होते. हा फोन फक्त एकाच प्रकारात सादर केला जाईल. या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असेल. या फोनची भारतीय किंमत अंदाजे 26,900 रुपयांपर्यंत असू शकते. मात्र फोनची खरी किंमत फोन लाँच झाल्यावरच पुढे येईल.
वर सांगितल्याप्रमाणे, लाँचपूर्वीच OnePlus 13 चे स्पेशल स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz इतके असेल. हा स्मार्टफोन गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शनसह येणार आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या हँडसेटमध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असण्याची अपेक्षा आहे.
तसेच, हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 50MP टेलिफोटो लेन्स मिळू शकतात. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी हा फोन 32MP फ्रंट कॅमेराने सुसज्ज असू शकतो. डिव्हाइसमध्ये 6000mAh बॅटरी मिळेल, जी 100W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येण्याची शक्यता आहे. मात्र, फोनचे कन्फर्म फीचर्स हा फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.