आगामी आणि बहुप्रतीक्षित OnePlus 13 चे महत्त्वाचे फीचर लीक! जाणून घ्या सर्व डिटेल्स 

आगामी आणि बहुप्रतीक्षित OnePlus 13 चे महत्त्वाचे फीचर लीक! जाणून घ्या सर्व डिटेल्स 
HIGHLIGHTS

OnePlus ची नवीन नंबर सिरीज टेक विश्वात लाँच करण्याची जबरदस्त तयारी सुरु

OnePlus 13 सिरीज जागतिक बाजारपेठेत लाँच होण्यासाठी सज्ज

OnePlus 13 सह संबंधित एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यावरून फोनच्या चार्जिंगची माहिती मिळाली आहे.

फ्लॅगशिप किलर OnePlus ची नवीन नंबर सिरीज टेक विश्वात लाँच करण्याची जबरदस्त तयारी सुरु आहे. आगामी OnePlus 13 सिरीज जागतिक बाजारपेठेत लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, नुकतेच चीनचे प्रमुख लुईस ली यांनी आगामी स्मार्टफोनला टीज केले होते. फोनबद्दल अनेक लीक्स सोशल मीडियावर पुढे येत आहेत. आता यासह संबंधित एक रिपोर्ट देखील समोर आला आहे, ज्यावरून फोनच्या चार्जिंगची माहिती मिळाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात, आगामी फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्चिंग डिटेल्सशी संबंधित माहिती-

Also Read: आगामी Infinix Zero Flip ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच! तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत?

OnePlus 13
OnePlus 13

OnePlus 13 चार्जिंग तपशील लीक

एका चीनी सोशल मीडिया साइटवर एका यूजरने आगामी OnePlus 13 च्या बांबू केसशी संबंधित प्रश्न विचारला तेव्हा Liu ने स्पष्ट केले आहे की, असे कव्हर्स येणार नाहीत. त्याऐवजी, ‘वूड ग्रेन्स’ केस येतील, जे मॅग्नेटिक सक्शन फंक्शनसह सुसज्ज असतील. हे सूचित करते की, डिव्हाइस मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंगच्या समर्थनासह येईल. या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, हे फीचर Apple च्या MagSafe प्रमाणे कार्य करेल.

OnePlus 13 चे सर्व तपशील लीक

स्मार्टफोन ब्रँड OnePlus ने अद्याप OnePlus 13 च्या लाँच संदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु लीक आणि रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, हा डिवाइस सर्वात आधी चीनमध्ये ऑक्टोबरच्या शेवटी लाँच केला जाईल. यानंतर हा फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात येणार आहे. OnePlus 13 ची सुरुवातीची किंमत 50 ते 60 हजारांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

OnePlus 13
OnePlus 13

लीकनुसार, फोटोग्राफीसाठी OnePlus च्या आगामी फोनमध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी असेल, जी 100W फास्ट चार्जिंच्या सपोर्टसह येऊ शकते. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट सारखे स्पेसिफिकेशन दिले जातील.

याव्यतिरिक्त, लीकवर विश्वास ठेवला तर, OnePlus 13 कर्व 2K LTPO डिस्प्लेसह येईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन क्वालकॉमच्या Snapdragon 8 Gen 4 फ्लॅगशिप प्रोसेसरसह देखील होईल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजपर्यंत सादर केला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo