OnePlus 13 India Launch: फ्लॅगशिप किलरच्या आगामी स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट Leak! वाचा डिटेल्स

Updated on 18-Dec-2024
HIGHLIGHTS

अलीकडेच कंपनीने OnePlus 13 फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी केली आहे.

सुप्रसिद्ध टीपस्टरने आगामी OnePlus 13 ची भारतीय लाँच तारीख लीक केली.

फोनमध्ये Qualcomm चा नवीनतम स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर मिळेल.

OnePlus 13 India Launch: प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर OnePlus चा आगामी स्मार्टफोन OnePlus 13 सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. या स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट अखेर लीक झाली आहे. लक्षात घ्या की, हा फोन कंपनीने ऑक्टोबर महिन्यात चीनी बाजारात लाँच करण्यात आला आहे. काही वेळापूर्वी कंपनीने OnePlus 13 फोनच्या भारतीय लाँचची पुष्टी केली आहे. सध्या हा फोन कंपनीच्या साइटवर आणि Amazon वर Coming Soon टॅगसह सूचीबद्ध आहे.

मात्र, कंपनीने फोनची भारतीय लाँच डेट अद्याप जाहीर केलेली नाही. पण, फोनच्या भारतीय लाँचची तारीख लीकमध्ये समोर आली आहे. कंपनी OnePlus 13 फोन सोबत OnePlus 13R देखील लाँच करणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात आगामी स्मार्टफोनची अपेक्षित लाँच तारीख-

Also Read: 2024 मध्ये Powerful फीचर्ससह भारतात लाँच झालेले टॉप 5 फ्लॅगशिप Smartphones, पहा संपूर्ण यादी

OnePlus 13 ची भारतीय लाँच डेट लीक

सुप्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने आपल्या अधिकृत X ( पूर्वीचे ट्विटर) अकाउंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे टीपस्टरने OnePlus 13 ची लाँच तारीख लीक करण्यात आली आहे. पोस्टनुसार हा स्मार्टफोन 7 जानेवारी 2025 रोजी भारतासह जागतिक बाजारपेठेत लाँच केला जाईल. या स्मार्टफोनसोबत कंपनी OnePlus 13R स्मार्टफोन देखील सादर करेल, अशी अपेक्षा आहे. तर, आणखी एका लीकनुसार, कंपनी OnePlus Winter Launch इव्हेंट अंतर्गत हा स्मार्टफोन सादर करेल.

OnePlus 13 चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, OnePlus 13 फोन आधीच चीनच्या बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा फोन भारतात देखील सामान स्पेसिफिकेशन्ससह लाँच होण्याची शक्यता आहे. त्यानुसार,या फोनमध्ये 6.82 इंच लांबीचा क्वाड-एचडी+ एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Qualcomm चा नवीनतम स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 24GB रॅम आणि 1TB स्टोरेज देखील मिळेल.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअपमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50MP पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर प्रदान केला जाऊ शकतो. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची बॅटरी 6000mAh असेल, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल. मात्र, फोनचे भारतीय स्पेक्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :