Revealing! बहुप्रतीक्षित OnePlus 12 आणि OnePlus 12R ची भारतीय किंमत लीक, तुमच्या बजेटमध्ये बसेल का किंमत? Tech News 

Revealing! बहुप्रतीक्षित OnePlus 12 आणि OnePlus 12R ची भारतीय किंमत लीक, तुमच्या बजेटमध्ये बसेल का किंमत? Tech News 
HIGHLIGHTS

OnePlus 12 आणि OnePlus 12R भारतात 23 जानेवारी 2024 रोजी लाँच होणार

OnePlus 12 आणि OnePlus 12R ची भारतीय किंमत ऑनलाईन लीक

आगामी स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला जाईल.

फ्लॅगशिप किलर OnePlus चे चाहते आगामी OnePlus 12 स्मार्टफोनची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. हा स्मार्टफोन लवकरच म्हणजे पुढील महिन्यात भारतात लाँच होणार आहे. यासोबतच कंपनी OnePlus 12R ला भारतीय बाजारात लाँच करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात 23 जानेवारी 2024 रोजी लाँच केला जाईल. लक्षात घ्या की, OnePlus चे फ्लॅगशिप फोन आधीच चीनमध्ये लाँच झाले आहेत. दरम्यान, प्रसिद्ध टिपस्टर आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमतही जाहीर केली आहे.

OnePlus 12 आणि OnePlus 12R ची भारतीय लीक किंमत

टिपस्टर योगेश बरार यांनी त्यांच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून आगामी OnePlus फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत उघड केली आहे. OnePlus 12 ची किंमत 58,000 ते 60,000 रुपयांच्या दरम्यान असेल, असे ट्विटमध्ये सांगितले गेले आहे. तर, OnePlus 12R ची किंमत 40 हजार ते 42 हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

OnePlus 12 आणि OnePlus 12R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

किमतीव्यतिरिक्त टीपस्टरने आगामी स्मार्टफोन्सचे काही स्पेसिफिकेशन्सदेखील सांगितले आहेत. त्यानुसार, आगामी स्मार्टफोन्समध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला जाईल. तर, फोनमध्ये 16GB रॅमसह 512GB पर्यंत स्टोरेज असेल. हा फोन ग्रीन आणि ब्लॅक कलर व्हेरिएंटसह उपलब्ध होऊ शकतो.

OnePlus 12

त्याचप्रमाणे, OnePlus 12R फोनमध्ये 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज असेल. तर, फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन ब्लु आणि ब्लॅक कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र, दोन्ही स्मार्टफोन्सची नेमकी किंमत हे फोन्स लाँच झाल्यावरच कळेल.

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 6.82 इंच QHD+ 2L OLED LTPO डिस्प्लेसह सुसज्ज आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. फोटोग्राफीसाठी फोन 50MP मुख्य कॅमेरा आणि 48MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरसह 64MP पेरिस्कोप लेन्सने सुसज्ज आहे. तर, 32MP सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे आहे. बॅटरी बॅकअपसाठी या फोनमध्ये 5400mAh बॅटरी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतीय व्हेरियंटमध्ये काही वेगळे फीचर्स देखील दिले जाऊ शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo