आगामी Nothing Phone (3a) चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक, मोठ्या बॅटरीसह मिळतील Powerful फीचर्स 

आगामी Nothing Phone (3a) चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक, मोठ्या बॅटरीसह मिळतील Powerful फीचर्स 
HIGHLIGHTS

आगामी Nothing Phone (3a) येत्या मार्च महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.

Nothing कंपनीने त्यांच्या आगामी लाँच इव्हेंटची तारीख देखील जाहीर केली आहे.

लाँच होण्यापूर्वी Nothing Phone (3a) चे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Nothing च्या आगामी स्मार्टफोनबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. आगामी Nothing Phone (3a) येत्या मार्च महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. अलीकडेच कंपनीने त्यांच्या आगामी लाँच इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 4 मार्च 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता भारतीय वेळेनुसार इव्हेंट आयोजित केला जाईल. मात्र, कंपनीने अद्याप या कार्यक्रमात लाँच होणारे डिव्हाइस उघड केलेले नाही.

Also Read: Price Cut! जबरदस्त Samsung Galaxy S24 वर तब्बल 10,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवी किंमत

आम्ही तुम्हाला सांगतो की, जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, Nothing या इव्हेंटमध्ये Nothing Phone (3a) आणि Phone (3a) Plus ची घोषणा करणार आहे. लाँच होण्यापूर्वी Nothing Phone (3a) चे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत.

Nothing Phone (3a) बद्दल लीक्स

लीकनुसार, Nothing Phone (3a) चे बहुतेक स्पेसिफिकेशन्स उघड झाले आहेत. स्पेसिफिकेशन्स, या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले असू शकतो. याआधी लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी हा स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 3 SoC सह लाँच करेल, असे पुढे आले आहे. हँडसेटमध्ये एक टेलीफोटो लेन्स दिसेल.

या हँडसेटचे दोन व्हेरिएंट सादर केले जाऊ शकतात. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळते. दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असू शकतो. यात स्टीरिओ स्पीकर्ससह USB टाइप-C चार्जिंग पोर्ट असण्याची अपेक्षा आहे. नवीन लीक झालेल्या अहवालानुसार, फोनमध्ये 50MP 2x टेलिफोटो लेन्स असेल, जो OIS ला सपोर्ट करेल. हा कॅमेरा सेटअप OnePlus 13R सारखाच असेल, असे देखील बोलले जात आहे.

Nothing Phone (3a) Expected price features specs

कॅमेरा सेन्सरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी प्लस मॉडेलमध्ये पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स देखील देऊ शकतो. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, यात 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा सेन्सर असेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील भागात 32MP कॅमेरा दिला जाईल. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळण्याची अपेक्षा आहे, जी 45W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. मात्र, फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल कन्फर्म माहिती, फोन लाँच झाल्यावरच पुढे येईल. याबाबत अपडेट ठेवण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo