Nothing Phone (3a): आकर्षक ट्रान्सपरंट डिझाईनसह स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, विशेष फीचर्स Leak
Nothing या वर्षी तीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
यात Nothing Phone (3), Phone (3a) और Phone (3a) Plus फोन समाविष्ट असतील.
या स्मार्टफोन्सच्या माध्यमातून कंपनी मध्यम आणि प्रीमियम दोन्ही रेंजची उपकरणे कव्हर करेल.
Nothing Phone (3a): ट्रान्सपरंट डिझाईन देण्यासाठी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Nothing या वर्षी तीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये Nothing Phone (3), Phone (3a) और Phone (3a) Plus फोनचा समावेश असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी या स्मार्टफोन्सच्या माध्यमातून मध्यम आणि प्रीमियम दोन्ही रेंजची उपकरणे सादर करणर आहे. अलीकडेच नथिंग फोन (3a) चे सर्टिफिकेशन वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आले आहे. जाणून घेऊयात Nothing Phone (3a) चे अपेक्षित लॉंचिंग तपशील-
Also Read: 50MP कॅमेरासह Moto G05 फोन भारतात लाँच, अगदी प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत
Nothing Phone (3a) लाँच
आम्ही तुम्हाला सांगतो की, BIS म्हणजेच भारतीय मानक ब्युरो आणि UL Demko प्रमाणन वेबसाइटवर Nothing Phone (3a) दिसला. मात्र, कोणता मॉडेल नंबर कोणत्या फोनचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या अहवालानुसा, हे मॉडेल Phone (3a) किंवा Phone (3a) Plus आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, मॉडेल नंबर व्यतिरिक्त, लिस्टिंगमध्ये इतर अनेक तपशील समोर आले आहेत. UL Demko सूचीनुसार Nothing Phone (3a) मोठी 5000mAh बॅटरी मिळेल.
याव्यतिरिक्त, Nothing’s Phone (3a) सीरीजचे दोन्ही फोन eSIM सपोर्टसह येतील. या सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन्स क्वालकॉमच्या प्रोसेसरसह ययेतील, अशी अपेक्षा आहे. होय, या स्मार्टफोन्सना Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर मिळण्याची अपेक्षा आहे, असे बोलले जात आहे. लक्षात घ्या की, आतापर्यंत कंपनीने स्मार्टफोनच्या लॉन्चिंग आणि स्पेसिफिकेशनबाबत अधिकृतपणे कोणताही खुलासा केलेला नाही. लवकरच कंपनी या संबंधी इतर माहिती शेअर करेल अशी अपेक्षा आहे.
Nothing Phone 2a
अलीकडेच लाँच झालेल्या कंपनीच्या स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाल्यास, Nothing Phone (2a) आणि (2a) Plus हे दोन्ही मध्यम-श्रेणी उपकरणे आहेत, ज्यांची किंमत सध्या भारतात 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल. त्यानुसार, आम्ही आगामी मॉडेल्स या किंमतीच्या आसपास लाँच होतील, अशी अपेक्षा करू शकतो. Nothing Phone (2a) मध्ये 6.7-इंच फुल एचडी प्लस OLED फ्लेक्स AMOLED डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी, 50MP सॅमसंग GN9 कॅमेरा सेन्सर आणि 50MP Samsung JN1 अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर आणि समोर 50MP Samsung JN1 सेन्सर मिळेल.
तर, Nothing Phone (2a) Plus फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा 2412×1084 पिक्सेल रिझोल्युशन फुल HD प्लस OLED फ्लेक्सी AMOLED डिस्प्ले मिळतो. जो 120 Hz ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह येतो. यात कॉर्निंग गोरिला Glass 5 प्रोटेक्शन बसवण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, यात 50MP प्राथमिक कॅमेरा सेन्सर आहे, जो OIS सपोर्टसह येतो. यात 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देखील आहे. तर, आकर्षक सेल्फीसाठी 50MP कॅमेरा सेन्सर आहे. हा फोन 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसह येतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile