digit zero1 awards

Nothing Phone (3) लवकरच मार्केटमध्ये होणार लाँच! CEO Carl Pei यांनी दिली महत्त्वाची माहिती, वाचा डिटेल्स 

Nothing Phone (3) लवकरच मार्केटमध्ये होणार लाँच! CEO Carl Pei यांनी दिली महत्त्वाची माहिती, वाचा डिटेल्स 
HIGHLIGHTS

आगामी स्मार्टफोन Nothing Phone (3) आणि Nothing Phone (3a) लवकरच लाँच होणार

Nothing चे CEO कार्ल पेई यांनी ईमेलद्वारे स्मार्टफोनचे लाँच डिटेल्स शेअर केले आहेत.

AI आधारित प्लॅटफॉर्म ऑफर करणारा हा पहिला स्मार्टफोन असेल.

Nothing Phone (3) सिरीजच्या लॉन्चिंगबद्दल अनेक दिवसांपासून टेक विश्वात चर्चा सुरु आहे. पुढे आलेल्या वृत्तांनुसार, कंपनी लवकरच आपले आगामी स्मार्टफोन Nothing Phone (3) आणि Nothing Phone (3a) लाँच करणार आहे. लक्षात घ्या की, आतापर्यंत या सिरीजच्या लाँचबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, ताज्या अहवालात, Nothing Phone (3) च्या लाँच टाइमलाइनची पुष्टी करण्यात आली आहे. वाचा सविस्तर-

Also Read: Jio New Plans: कंपनीने लाँच केले दोन नवीन प्रीपेड प्लॅन्स! मिळेल तब्बल 164GB मोबाईल डेटा, OTT बेनिफिट्स उपलब्ध

Nothing Phone (3) to launch in March 2025

Nothing Phone (3)

Nothing चे CEO कार्ल पेई यांनी ईमेलद्वारे स्मार्टफोनचे लाँच डिटेल्स शेअर केले आहेत. खरं तर, लोकप्रिय टिपस्टर इव्हान ब्लासने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून ‘नथिंग फोन (3)’ च्या लॉन्चिंगचे तपशील शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये टिप्सटरने कंपनीचे सीईओ कार्ल पेई यांचा अंतर्गत ईमेल शेअर केला आहे. पोस्टनुसार, कार्ल पेईने 2 जानेवारी 2025 रोजी हा ईमेल पाठवला होता. त्याचा विषय “2025: Nothing’s year of innovation” आहे. ईमेलमध्ये पुष्टी करण्यात आली आहे की, नथिंग फोन (3) स्मार्टफोन या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच 2025 मध्ये लाँच केला जाईल.

तसेच, लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार हा फोन मार्चच्या अखेरीस लाँच केला जाईल. त्याबरोबरच, आगामी फ्लॅगशिप फोनमध्ये त्याच्या यूजर इंटरफेसमध्ये क्रांतिकारक नवकल्पनांची अपेक्षा आहे, असे देखील बोलले जात आहे. AI आधारित प्लॅटफॉर्म ऑफर करणारा हा पहिला स्मार्टफोन असेल.

nothing phone 3a

Nothing Phone (3) आणि Nothing Phone (3a)

अपेक्षित तपशिलांबद्दल बोलायचे झाल्यास, नथिंग फोन (3) फ्लॅगशिप फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 किंवा Snapdragon 8s Elite SoC आढळू शकते.तर , 2025 मध्ये Nothing Phone (3a) आणि Nothing Phone (3a) Plus लाँच होण्याची देखील अपेक्षा आहे. दोन्ही उपकरणांमध्ये eSIM कनेक्टिव्हिटी मिळेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, स्मार्टफोन ब्रँडने आपल्या कॅमेरा आणि सॉफ्टवेअर टीममध्ये सुमारे 50% वाढ केली आहे. यामुळे आगामी Nothing स्मार्टफोनमध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात.

Nothing Phone 2 ची किंमत

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर Nothing Phone 2 ची किंमत 8GB+128GB व्हाईट व्हेरियंटसाठी 33,999 रुपयांपासून सुरू होते. तर, फोनचा टॉप-एंड 12GB+ 512GB ग्रे मॉडेलसाठी किंमत 36,999 रुपयांपर्यंत जाते. नथिंग फोन 2 च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यात डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये दोन्ही लेन्स 50MP चे आहेत, फोनमध्ये Sony IMX890 सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. HDR देखील कॅमेरासह समर्थित आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo