Nothing : ‘या’ तीन बाबतीत Phone 1 ला मात देईल आगामी Phone 2, बघा संपूर्ण तपशील

Nothing : ‘या’ तीन बाबतीत Phone 1 ला मात देईल आगामी Phone 2, बघा संपूर्ण तपशील
HIGHLIGHTS

Nothing Phone 2 ची टेक विश्वात बरीच चर्चा सुरु आहे.

हा फोन जुलैमध्ये सादर केला जाईल, अशी कंपनीने पुष्टी केली आहे.

फोन Snapdragon 8 Gen 1 SoC सह येईल अशी अपेक्षा आहे.

कंपनीचा आगामी आणि बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Nothing Phone 2 ची टेक विश्वात बरीच चर्चा सुरु आहे. कंपनी हा फोन या वर्षी लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा फोन जुलैमध्ये सादर केला जाईल, अशी कंपनीने पुष्टी केली आहे. तसेच, फोनच्या काही फीचर्सची पुष्टी देखील केली आहे. याद्वारे नवा फोन जुन्या फोनला कसा मागे टाकेल ते बघुयात – 

कार्ल पेईने शेअर केलेल्या माहितीवरून हे अगदी स्पष्ट झाले आहे की, नथिंग फोन (2) मध्ये तीन प्रमुख फरक आहेत, जे ते नथिंग फोन (1) पेक्षा वेगळे करतात.

1. प्रोसेसर : 

Nothing Phone (1) स्नॅपड्रॅगन 778G+ चिपसेटसह सुसज्ज होता. पण नथिंग फोनसाठी (2) Pei ने पुष्टी केली आहे की, काहीतरी चांगले असेल.  त्यामुळे फोन Snapdragon 8 Gen 1 SoC सह येईल अशी अपेक्षा आहे. 

2. बॅटरी :

द नथिंग फोन (1) 4500mAh बॅटरीने सज्ज होता. तर अफवांनुसार, फोन (2) मध्ये 4700mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.

3. कॅमेरा : 

नथिंग फोन (1) मध्ये 50MP वाइड अँगल प्राइम लेन्स आणि 50MP अल्ट्रावाइड लेन्ससह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तर, नथिंग फोन (2) मध्ये 50MP चे तीन कॅमेरे असतील. मात्र, याबाबत काही अधिकृत पुष्टी झाली नाही. 

याशिवाय, Nothing Phone 2 बाबत अनेक अफवा देखील पुढे आलेल्या आहेत, ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo