Motorola चा आगामी स्मार्टफोन फक्त 7000 रुपयांअंतर्गत लाँच होण्याची शक्यता, लवकरच भारतात होणार लाँच। Tech News 

Motorola चा आगामी स्मार्टफोन फक्त 7000 रुपयांअंतर्गत लाँच होण्याची शक्यता, लवकरच भारतात होणार लाँच। Tech News 
HIGHLIGHTS

Motorola चा आगामी Moto G04 भारतात लाँच होण्याची शक्यता

आगामी स्मार्टफोनबद्दल कंपनीने अधिकृतपणे दिली माहिती

Moto G04 भारतात 7 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Motorola ने अलीकडेच भारतात स्वस्त स्मार्टफोन Moto G24 Power लाँच केला आहे, ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन कंपनीने बजेट रेंज विभागात लाँच केला आहे. त्यानंतर आता कंपनी भारतात आणखी एक कमी किमतीचा फोन सादर करणार आहे. होय, ब्रँडने या आगामी स्मार्टफोनला त्याच्या अधिकृत X (Twitter) हँडलद्वारे टीज केले आहे. हा स्मार्टफोन लवकरच Moto G04 नावाने भारतात लाँच करण्यात येणार आहे. बघा सर्व डिटेल्स-

Moto G04 India लॉन्चिंग डिटेल्स

Motorola India ने आपल्या आगामी स्मार्टफोनचा फोटो शेअर करून नवीन लाँचबद्दल माहिती दिली आहे. ट्विटमध्ये फोनचा बॅक पॅनल दिसत आहे, जो अलीकडेच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झालेल्या Moto G04 स्मार्टफोनसारखा आहे. त्यामुळे सुरक्षितपणे असे मानले जात आहे की ब्रँडचा आगामी फोन Moto G04 आहे. मात्र, लक्षात घ्या की, कंपनीने अद्याप डिव्हाइसचे नाव अधिकृतपणे उघड केलेले नाही. कंपनी लवकरच फोनची अधिकृत लाँच तारीख उघड करेल.

Moto G04 अपेक्षित किंमत

Moto G04 जागतिक बाजारात €119 किमतीत लाँच करण्यात आला होता. त्यामुळे ही किंमत भारतीय चलनात सुमारे 10,699 रुपये आहे. यावरून Moto G04 भारतात 7 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. आगामी Moto G04 ला नुकत्याच रिलीज झालेल्या Moto G24 Power पेक्षा कमी किमतीत लाँच होईल, असा अंदाज आहे.

MOTOROLA MOTO G24 POWER

Moto G04 चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेक्स

वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन ग्लोबली आधीच लाँच झाला आहे. त्यानुसार, Moto G04 मोठ्या 6.6-इंच लांबीच्या स्क्रीनसह येतो, ज्याचे रिफ्रेश रेट 90Hz इतके आहे. हा Motorola फोन Android 14 OS वर लाँच केला गेला आहे. प्रक्रियेसाठी, या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 CPU आहे. स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करतो. तर, यामध्ये 4GB रॅम बूस्टर टेक्नॉलॉजी देखील आहे.

फोटोग्राफीसाठी, Moto G04 च्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज 16-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा फोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी नवीन मोटोरोला स्मार्टफोन 5000mAh बॅटरी सज्ज असून 10W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने समर्थित आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo