Motorola कंपनीने G सीरीज अंतर्गत अनेक स्मार्टफोन भारतात आणले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Motorola च्या G सिरीजचे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. आता या यादीत आणखी एका स्मार्टफोनचे नाव जोडले जाणार आहे. होय, कंपनी लवकरच आपला नवा स्मार्टफोन Moto G45 5G भारतात लाँच करणार आहे. कंपनीने Moto G45 5G स्मार्टफोनच्या भारतातील लॉन्च तारखेची पुष्टी केली आहे. विशेष म्हणजे Motorola G45 हा कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन असेल. जाणून घेऊयात आगामी फोनचे भारतीय लाँचिंग डिटेल्स-
Motorola कंपनीने Moto G45 स्मार्टफोनला समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर लाइव्ह केले आहे. त्यावरून समजलेच असेल की, हा फोन खरेदीसाठी Flipkart वर उपलब्ध करून दिला जाईल. या लिस्टिंगद्वारे या फोनचे अनेक महत्त्वाचे फीचर्स आणि लाँच डेट निश्चित करण्यात आले आहेत. हा फोन भारतात 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. कंपनी आगामी स्मार्टफोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर करू शकते, असे मानले जात आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, Flipkart लिस्टिंगद्वारे लाँचपूर्वी फोनचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. त्यानुसार, फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. त्याबरोबरच, या स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन देखील यात असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसरसह सुसज्ज असेल, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे.
त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा दिला जाईल. एवढेच नाही तर, Moto G45 फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल. ज्यामध्ये रेड, ब्लु आणि ग्रीन कलर ऑप्शन्स उपलब्ध असतील. याशिवाय, फोनच्या मागील बाजूस अल्ट्रा-प्रिमियम डिझाइन दिले जाईल, जे लेदर फिनिशसारखे दिसते. कंपनी फोनचे इतर सर्व फीचर्स आणि किंमत संबंधित माहिती 21 ऑगस्ट रोजी उघड करेल.