आगामी Moto G85 5G फोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळतील 32MP सेल्फी कॅमेरासारखे Powerful फीचर्स 

आगामी Moto G85 5G फोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळतील 32MP सेल्फी कॅमेरासारखे Powerful फीचर्स 
HIGHLIGHTS

आगामी स्मार्टफोन Moto G85 5G ची भारतीय लाँच डेट देखील जाहीर

Moto G85 5G कंपनीचा नवीनतम मिड-रेंज स्मार्टफोन असेल.

Moto G85 5G फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट कंपनीच्या साइटवर लाईव्ह

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने नुकतेच आपला महागडा स्मार्टफोन Moto Razr 50 Ultra 5G भारतात लाँच केला आहे. दरम्यान, कंपनीचा आगामी स्मार्टफोन Moto G85 5G ची भारतीय लाँच डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीनतम मिड-रेंज स्मार्टफोन असेल. हा फोन लाँच होण्यापूर्वीच कंपनीच्या साइटवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगच्या माध्यमातून फोनचे अनेक फीचर्स उघड झाले आहेत.

Also Read: अनेक AI फीचर्ससह Moto Razr 50 Ultra 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि आकर्षक ऑफर्स

Moto G85 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स

Motorola India ने Moto G85 5G स्मार्टफोनच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. हा फोन भारतात 10 जुलै रोजी लाँच होणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनसाठी डेडिकेटेड मायक्रोसाइट कंपनीच्या साइटवर लाईव्ह करण्यात आली आहे. तसेच, वर सांगितल्याप्रमाणे, या साईटच्या माध्यमातून फोनचा लुक आणि फीचर्स समोर आले आहेत.

Moto G85 5G फोन कोबाल्ट ब्लू, अर्बन ग्रे आणि ऑलिव्ह ग्रीन या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल.फोनच्या मागच्या बाजूला व्हेगन लेदर फिनिश उपलब्ध आहे. याशिवाय, फोनमध्ये 2 वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स दिले जातील. त्याबरोबरच, हा फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

Moto G85 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

अधिकृत साईटवरून फोनचे अनेक फीचर्स उघडकीस आले आहेत. Moto G85 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ कर्व pOLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सपोर्ट देखील देण्यात येईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असेल. तसेच, पाण्यापासून संरक्षणासाठी यात IP52 रेटिंग उपलब्ध आहे.

Moto G85 5G स्मार्टफोनच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. हा फोन भारतात 10 जुलै रोजी लाँच होणार आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप प्रदान केला जाईल. ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश असेल. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. तुम्हाला सुरक्षेसाठी फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरदेखील मिळणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo