Moto G6 Plus स्मार्टफोन या दिवशी केला जाऊ शकतो लॉन्च, कंपनी ने दिली माहिती

Updated on 05-Sep-2018
HIGHLIGHTS

आता Motorola ने त्यांची Moto G6 सीरीज भारतात लॉन्च करण्याची वेळ जवळ आली आहे. त्यानुसार कंपनी ने आपल्या सोशल मीडिया चॅनल च्या माध्यमातून याची माहिती पण दिली आहे.

आता Motorola ने त्यांची Moto G6 सीरीज भारतात लॉन्च करण्याची वेळ जवळ आली आहे. त्यानुसार कंपनी ने आपल्या सोशल मीडिया चॅनल च्या माध्यमातून याची माहिती पण दिली आहे. अशी माहिती मिळाली आहे की Motorola Moto G6 Plus स्मार्टफोन भारतात 10 September म्हणजे आज पासून काही दिवसांनी लॉन्च केला जाऊ शकतो. तुमच्या लक्षात असेलच की जून 2018 मध्ये भारतात Moto G6 आणि Moto G6 Play उपलब्ध करण्यात आले होते. 

The new #motog6plus is set to arrive on 10th September and is built to give you more with every feature!
Which one are you most excited about? Take a screenshot and share it with us! #BuiltForMore pic.twitter.com/HyoigsRBv3

— Motorola India (@motorolaindia) September 4, 2018

Motorola Moto G6 Plus स्पेसिफिकेशन्स आणि फीचर
आता कंपनी ने केलेल्या एका ट्विट मधून असे समोर येत आहे की Moto G6 Plus लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. याच्या काही स्पेक्स आणि फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये तुम्हाला 5.99-इंचाची एक 1080×2160 पिक्सल ची FHD+ स्क्रीन मिळत आहे. हा एक 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. फोन मध्ये या सोबत तुम्हाला क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 630 चिपसेट पण मिळत आहे. यात 6GB रॅम सोबत 64GB ची इंटरनल स्टोरेज पण मिळत आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने 256GB पर्यंत वाढवू शकता. फोन एंड्राइड Oreo वर चालतो, पण असे बोलले जात आहे की याला लवकरच एंड्राइड पाईचा पण सपोर्ट मिळू शकतो. 

फोटोग्राफी साठी डिवाइस मध्ये एक 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एक 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात एक 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण आहे. पण काही बाजारांत हा एका 16-मेगापिकसलच्या फ्रंट कॅमेरा सह पण लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये एक 3200mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. यात पण फिंगरप्रिंट सेंसर ऐवजी फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :