आगामी Moto G35 च्या लाँचपूर्वीच किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक, तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवा फोन? 

आगामी Moto G35 च्या लाँचपूर्वीच किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक, तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवा फोन? 
HIGHLIGHTS

अलीकडेच आगामी स्मार्टफोन Moto G35 5G च्या भारतीय लाँचची घोषणा

Moto G35 5G फोन भारतीय बाजारात 10 डिसेंबर रोजी लाँच होणार

Moto G35 5G हा फोन 15 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये आणला जाऊ शकतो.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने नुकतेच आपल्या आगामी स्मार्टफोन Moto G35 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर, कंपनीने या फोनची लाँच डेट देखील जाहीर केली आहे. जर तुम्हाला स्वस्त 5G फोन घ्यायचा असेल, तर मोटोरोलाचा नवीन मोबाईल Moto G35 पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. हा एक बजेट रेंज स्मार्टफोन असेल, जो स्टायलिश लुक, उत्कृष्ट फीचर्स आणि पॉवरफुल स्पेसिफिकेशन्ससह येईल. जाणून घेऊयात आगामी Moto G35 5G चे तपशील-

Also Read: OnePlus 13 Launch: अनेक AI फीचर्ससह फोन लवकरच भारतात होणार लाँच, Amazon वर सूचिबद्ध

Moto G35 5G with 4k video recording camera launching

Moto G35 5G ची लाँच डेट आणि अपेक्षित किंमत

आगामी Moto G35 5G फोन भारतीय बाजारात 10 डिसेंबर रोजी लाँच होणार आहे. होय, कंपनी 10 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता त्यांच्या अधिकृत X द्वारे या फोनची किंमत आणि विक्रीची तारीख जाहीर करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Moto G35 5G च्या लाँचची घोषणा प्रसिद्ध शॉपिंग साईट Flipkart वर आहे.

Moto G35 5G फोनची अपेक्षित किंमत भारतात 4GB रॅम सह 128GB स्टोरेजसह लाँच केला जाईल. हा फोन 15 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये आणला जाऊ शकतो. तसेच, फोनचे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील पुढे आले आहेत. भारतात हा फोन लीफ ग्रीन, गावा रेड आणि मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.

Moto G35 5G चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मिळालेल्या माहितीनुसार, Moto G35 5G फोन गोल-एज फ्लॅट पंच-होल डिस्प्लेवर तयार केला आहे. या फोनमध्ये 6.72-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन LTPS LCD पॅनेलवर बनवली आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Unisoc T760 ऑक्टा-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल, अशी देखील माहिती मिळाली आहे.

Upcoming-Moto-G35-5G-in-India.png

फोटोग्राफीसाठी, LED फ्लॅशसह यात 50MP चा मुख्य सेन्सर आणि 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोनमध्ये मजबूत 5000 mAh बॅटरी मिळेल, जी 20W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. मात्र, या फोनची खरी किंमत आणि कन्फर्म स्पेसिफिकेशन्स फोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo